कामांचा दर्जा गुणवत्ता चांगली राहिल,याबाबत संबधित विभाग अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी

    पंढरपूर,१७/१०/२०२०- पंढरपूरात जवळपास एक हजार कोटींची विकासकामे झाली आहेत. मात्र ती अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली आहेत. सध्या सुरु असलेल्या घाटाचे काम देखील निकृष्ठ दर्जाचे झाले आहे.पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्या तून सुरु असलेल्या घाटांचा तसेच इतर कामांचा दर्जा व गुणवत्ता चांगली राहिल,याबाबत संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी. याबाबत पुणे येथे दोन तीन दिवसात आढावा बैठक घेवून माहिती घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते.


त्यानंतर बोलताना राष्ट्रवादी युवक काँग्रेस पंढरपूर शहराध्यक्ष संदिप मांडवे म्हणाले, राष्ट्रवादी यूवक कांँग्रेसच्यावतीने पंढरपूरमध्ये होत असलेल्या निकृष्ट घाटाच्या भिंतीच्या कामाबद्दल आंदोलन केले होते.त्याचवेळी PWD आणि नगरपरिषदेने या निकृष्ट कामावर कारवाई केली असती तर ही वेळ आली नसती.अजूनही वेळ गेलेली नाही कारण पंतप्रधान आवास योजना कामही असेच निकृष्ट सूरु आहे आणि पूररेषेत येत आहे या साठीही राष्ट्रवादी युवक काँग्रेसवतीने पाठपूरावा करण्यात येत आहे. त्यामुळे आता तरी पंढरपूर नगरपरिषदेने आवास घरकूल योजनेतील भ्रष्टाचार व चुकीचे काम थांबवावे अन्यथा राष्ट्रवादी युवक कांग्रेस पंढरपूर तीव्र आंदोलन करणार असल्याचे ही शहराध्यक्ष संदिप मांडवे यांनी सांगितले.
 
Top