राष्ट्रसंत तुकडोजी महाराज Rastrasant Tukdoji Maharaj यांचा आज स्मृतिदिन. "आते है नाथ हमारे" हे त्यांनी रचलेले पद त्या काळात स्वातंत्र्यलढ्यासाठी स्फूर्तिगान ठरले होते. भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी त्यांची श्रद्धा व विचारसरणी होती. समाजा तल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल, याविषयी त्यांनी सतत प्रबोधन केले.

तुकडोजी महाराज tukdoji Maharaj यांचे पूर्ण नाव माणिक बंडोजी इंगळे,(१९०९-१९६८) यांनी अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला.आत्म संयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते.आडकोजी महाराज हे त्यांचे गुरू. महाराष्ट्रासह देशभर आणि जपान सारख्या देशात जाऊन त्यांनी आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. सन १९४२च्या भारत छोडो आंदोलना दरम्यान काही काळ त्यांना अटक झाली होती.

अशा या महान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना विनम्र अभिवादन.
 
Top