चालू घडामोडी आणि बातम्या प्रसारीत करण्यासाठी थेट परकीय गुंतवणूकीला मंजूरी
   नवी दिल्‍ली,PIB Mumbai,१६/१०/२०२० - उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभाग (DPIIT) ला केंद्र सरकारने सरकार मान्य पद्धतीने डिजीटल माध्यमांचा वापर करुन चालू घडामोडी आणि बातम्या प्रसारीत करण्यासाठी २६ % थेट परकीय गुंतवणूकीला मंजूरी दिली आहे. माहिती व प्रसारण मंत्रालय नजीकच्या भविष्यकाळात पारंपरिक माध्यमे (मुद्रीत आणि दूरचित्रवाहिनी) यांना असलेल्या पुढील सुविधा डिजीटल माध्यमांना देण्याचा विचार करत आहे. 

    पत्रकार,कॅमेरामन,व्हिडीओग्राफर्स यांना पीआयबी अधीस्वीकृती दिली जाईल,या माध्यमातून त्यांना तात्काळ माहिती आणि अधिकृत पत्रकरपरिषदा आणि इतर संवादांना प्रवेश मिळेल.

    पीआयबी अधीस्वीकृतीधारकांना सीजीएचएस लाभ आणि सवलतीच्या दरात प्रवास सुविधा विद्यमान प्रक्रियेनुसार मिळते.

    ब्युरो ऑफ आऊटरीच अँड कम्युनिकेशन यांच्याकडील जाहिरातीसाठी पात्रता - मुद्रीत आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमां मधील स्वयं-नियमन करणार्‍या संस्थांप्रमाणेच, डिजिटल माध्यमांमधील संस्था त्यांचे स्वारस्य आणि सरकारशी संवाद साधण्यासाठी स्वयं-नियमन संस्था तयार करू शकतात.
 
Top