शेळवे,ता.पंढरपूर,(संभाजी वाघुले)- पंढरपूर तालुक्यासह जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे बागायती आणि जिरायती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.त्याचबरोबर भीमा नदीच्या पात्रात पाणी जादा क्युसेस सोडले,ओढे जास्त प्रमाणात भरून वाहत असल्याने या नुकसानीत भर पडली आहे.       नुकतेच शेळवे येथील जुन्या रस्त्यावरील कासाळ ओढ्यालगतच्या गावांमधून पाणी शिरलेने प्रचंड आर्थिक आणि प्राणी हानी झाली आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शेळवे येथे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आ.प्रविण दरेकर ,खा.जयसिद्धेश्वर स्वामी,आ.विजयकुमार देशमुख, आ.प्रशांत परिचारक,आ.गोपीचंद पडळकर आदी संबंधित विभागाचे अधिकारी यांच्यासह आले होते

   या कासाळ ओढ्यामुळे व भिमा नदीच्या पाण्याबरोबर घरे ,जनावरे,पिके व जमिनीही वाहून गेल्या मुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झालेले आहे.हे नुकसान भरून येणारे नसले तरी शेतकर्यांना आर्थिक ताकद देण्यासाठी तातडीने मदत मिळेल यासाठी कारवाई करत आर्थिक मदत उपलब्ध होऊन लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशीही शेतकर्यांनी यावेळी मागणी करत मागील पुराची अजुनही भरपाई मिळाली नसल्याचेही शेतकरी बांधवांनी सांगितले.
 
Top