शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी. यासाठी शेट्टी यांनी प्रयत्न करावेत 


पंढरपूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज दि.१९/१०/ २०२० रोजी पंढरपूर तालुक्यातील पावसामुळे नुकसान झालेल्या द्राक्षबागा व खरीप हंगामी पिकांची पाहणी केली. यावेळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्या व्यथा राजू शेट्टी यांच्यासमोर मांडल्या. शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी. यासाठी शेट्टी यांनी प्रयत्न करावेत अशी मागणी केली.


      या दौऱ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, युवा जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे,तालुकाध्यक्ष सचिन पाटील,संपर्क प्रमुख रायाप्पा हळणवर,रणजित बागल,विष्णु बागल, प्रताप गायकवाड, साहेबराव नागणे, शहाजहान शेख, बाहुबली सावळे आदी उपस्थित होते.

       याला जिल्हा प्रशासन सर्वस्वी जबाबदार              

 या पाहणी दौर्‍यानंतर प्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, भीमा नदीचा पूर हा मानवनिर्मित असून नागरिकांच्या घराच्या व शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे़ .याला जिल्हा प्रशासन सर्वस्वी जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी.
   
    पुढे बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले,हवामान खात्याने दिलेल्या इशार्याकडे जिल्हा व आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. भीमा नदीला दुपारी ५ हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले होते आणि रात्री अचानक दोन लाखाचा विसर्ग सोडण्यात आला. नागरिक जीव जाण्याच्या भीतीने तत्काळ स्थलांतरित झाले.यामुळे जिल्हा प्रशासनावर कारवाई करावी अशी मागणी करणार असल्याचे राजू शेट्टींनी सांगितले.

     केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याकडून पूरग्रस्त भागातील शेतकरी आणि नागरिकांना झालेल्या नुकसानीची भरपाई करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सांगितले.

आजतागायत ज्या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे एफआरपी  प्रमाणे पैसे दिले नाहीत त्यांच्यावरती साखर आयुक्तांनी कारवाई करावी यासाठी प्रयत्न करत असून साखर आयुक्तांनी जर यासाठी सकारात्मक निर्णय दिला नाही तर त्यांच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल.  
 
Top