पालघर,१९/१०/२०२० -  जयनंदन गणेश पासवान वय २५ वर्ष , राहुल गणेश पासवान वय २६ वर्ष, दोन्ही राहणार - सिडको कॉलनी , बोईसर हे पोलीस स्टेशन तारापूर CR NO. 45 आणि 46 /2020 तसेच पोलीस स्टेशन बोईसर CR NO. 273/2020 कलम 392,34 या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेले आरोपी आहेत. नमूद आरोपी हे बोईसर पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. सध्या ते कोळगाव गणेश मंदिरच्या मागे राहत होते. 

       आज रोजी वरील गुन्ह्यातील सहभागाबद्दल स्था.गु.शा. पालघर यांना तपासादरम्यान अचानक माहिती मिळाली असता कोळगाव येथील राहते ठिकाणी जाऊन शोध घेण्याचा प्रयत्न करीत असताना आरोपी शंकर सुखदेव पाटोळे,राहणार कोळगाव यास ताब्यात घेण्यात आले असून यातील वर नमूद दोन आरोपी पोलिसांची चाहूल लागताच कोळगाव जंगल परिसरात पळून गेले आहेत. सदर आरोपी ह्यांच्या अंगावर फक्त अंडरपँट घातलेली आहे. तरी या आरोपींचा शोध घेऊन माहिती मिळून आल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा. 

  पालघर नियंत्रण कक्ष - 9730711119, 9730811119
शैलेश काळे,SDPO बोईसर- 7020352004
रवींद्र नाईक,PI LCB - 9867112787
प्रदीप कसबे,PI बोईसर- 7020715230.
संतोष जाधव, API तारापूर- 9594945354.
 
Top