नवीदिल्ली,०९/१०/२०२०- आपल्या ट्वीट संदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi म्हणाले,माझे दुःख शब्दातीत आहे. पासवानजी Ram Vilas Paswanयांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचा अतुल्य अनुभव होता.कॅबिनेट बैठकांदरम्यानचे त्यांचे विचार समजूतदारपणाचे होते. राजकीय बुद्धिमत्ता, शासकीय मुद्यांवरील मुत्सद्दीपणात ते अतिशय हुशार होते. आपल्या देशात कदाचित कधीच भरुन न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. राम विलास पासवानजी यांचे निधन वैयक्तिक हानी आहे. मित्र आणि गरीबांना सन्मानपूर्वक जीवन प्रदान करण्यासाठी झटणारा मौल्यवान सहकारी मी गमावला आहे.

रामविलास पासवानजी कष्टाने आणि दृढनिश्चया तून राजकारणात उदयाला आले होते. युवा नेते असताना त्यांनी आणीबाणीच्या काळातील अत्याचार आणि लोकशाहीवरील हल्ल्याचा प्रतिकार केला. ते उत्कृष्ट संसदपटू आणि मंत्री होते, अनेक धोरणात्मक क्षेत्रांमध्ये त्यांचे योगदान होते.त्यांचे कुटुंब आणि समर्थकांप्रती सहवेदना. ओम शांती.
 
Top