पंढरपूर,१९/१०/२०२०-येथील प्रसिद्ध व्यापारी आणि जैन समाजातील जेष्ठ श्री मोहनलाल रूपचंद फडे यांचे दिनांक १८ ऑक्टोंबर २०२० रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. मृत्यु समयी त्यांचे वय ९८ वर्ष होते.ते व्यापारी कमिटी पंढरपूरचे माजी अध्यक्ष तसेच फडे दिगंबर जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष होते.
त्यांच्या पश्चात तीन मुले,सुना, चार मुली, नातवंडे व परतवंडे असा मोठा परिवार आहे.शेवटपर्यंत धर्मामध्ये रत असलेले श्री मोहनलाल रूपचंद फडे यांचे निधनाने एक धार्मिक , सामाजिक व्यक्तीमत्व हरपले.