पंढरपूर येथील जिजामाता शॉपिंग सेंटरमधील व्यापाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात


  पंढरपूर,१७/१०/२०२० - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या उपस्थितीत नगरपालिका मुख्याधिकारी अनिकेत मानोरकार यांना निवेदन देऊन चर्चा केली.यावेळी नगरपालिका उपमुुख्याधिकारी सुनिल वाळुजकर उपस्थित होते. पंढरपूर येथे अतिवृष्टीमुळे मोठा पूर आला. शहरातील पाण्याचा निचरा न झाल्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले,अनेक लोकांच्या घरात पाणी शिरले तसेच अनेक दुकानात पाणी साचल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. छत्रपती शिवाजी महाराज चौका तील जिजामाता शॉपिंग सेंटरमधील सर्व दुकानात पाणी शिरले होते त्यामुळे खूप नुकसान झाले आहे. त्या संदर्भात तेथील पाणी त्वरित काढण्यात यावे आणि गाळेधारकांना गाळ्यांची उंची वाढवण्यास परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली.


   यावेळी मुख्याधिकारी यांनी त्वरित कारवाई करण्याचे संबंधितांना आदेश दिले आहेत .यावेळी नगरपालिका उपमुुख्याधिकारी सुनिल वाळुजकर, मनसेे उपाध्यक्ष महेश पवार ,नागेश इंगोले, अभिजित डूबल,व्यापारी सचिन घोडके,दिलीप वाघमारे,कुमार जाधव,लियाकत तांबोळी,धोंडीराम माळी, मोहन माळी,गणपत टाकणे,मधुसूदन भट्टड,श्रीकांत राठी आदी उपस्थित होते.
 
Top