शेळवे ग्रामस्थांनी मांडल्या व्यथा


शेळवे,(संभाजी वाघुले),२२/१०/२०२० - उजनी व वीर धरणातुन भिमा नदीत सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे शेळवे परिसरात पुरस्थिती निर्माण झाली होती.या पुरामुळे शेळवे परिसरातील संपुर्ण शेती पाण्याखाली गेल्यामुळे या परिसरातील ऊस , केळी,मका,द्राक्षे,डाळिंब,आंबा,पेरु व चिंच या सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. यामुळे शेळवे येथील शेतकर्यांच्या ७/१२ ऊतार्या प्रमाणे नुकसान भरपाई मिळावी .तसेच शेळवे पुरबाधित परिसरातील घरांचे व शेतीचे पंचनामे सरसकट करण्याचीही मागणी शेळवे ग्रामस्थांनी केली आहे.

तसेच सतत येणार्या महापुरामुळे शेळवे गावात सर्वात प्रथम मागासवर्गीय लोकांच्या घरात भिमा नदीच्या पुराचे पाणी प्रत्येक वेळेला घुसत असल्याने यांना स्वतंञ गावठाण मंजुर करुन या लोकांचे पुनर्वसन करण्याचीही मागणी या लोकांनी केली आहे.

शेळवे गावाला पुरांने वेढा टाकुन अनेक घरातही पाणी घुसलेले होते . शेळवे गावाला वेढा पडत असतानाच गावातील लोक आपला अत्यावश्यक सामान व जनावरे घेऊन सुरक्षित स्थळी निघुन गेले होते .

या महापुरामुळे मागासवर्गीय भागातील मुख्य रस्ता दुरुस्तीची मागणी व मागासवर्गाला गावठाण मंजुर करुण देण्याची मागणी माजी ग्रा.प.सदस्य दादासाहेब लोखंडे यांनी केली आहे.

शेळवे परिसरातील शेळवे -भंडीशेगाव ,शेळवे -बरड वस्ती,बाजीराव विहीर(गायराण वस्ती) ते काॅलेज चौक शेळवे,दत्त मंदिर ते खोराड (गाजरे) वस्ती व शेळवे -वाडीकुरोली,भंडीशेगाव ते जुना कौठाळी रस्ता (म्हसोबा मंदिरापर्यंत) या सर्वच रस्त्यांची अवस्था दयनीय झालेली आहे. या सर्वच रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी माजी ग्रा.प. सदस्य नामदेव गोरख गाजरे व शेळवे ग्रामस्थांनी आ शहाजी पाटील यांच्याकडे केली आहे.

यावेळी आ.शहाजी पाटील ,पंढरपुर तहसिलदार वैशाली वाघमारे ,पंढरपुर गटविकास अधिकारी रविकीरण घोडके ,बांधकाम अभियंता बागल व उपअभियंता कपिल,डि.के. कांबळे ,विस्तार अधिकारी नलवडे तसेच शेळवे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top