लायन्स संस्थेच्यावतीने डॉ बोधले,विवेक परदेशी व आशा ताई यांना कोव्हीड योद्धा पुरस्कारलॉकडाउन कालावधीमध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल व करत असल्याबद्दल तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ एकनाथ बोधले यांचा सन्मान लायन्स अध्यक्ष lions club डॉ सुजाता गुंडेवार यांनी केला.आरोग्य सभापती विवेक परदेशी यांचा सन्मान ईनरव्हील संस्थेच्या संस्थापिका नगीना बोहरी यांनी केला तसेच पंढरपूरातील सर्व आशा कर्मचारी यांना कोव्हीड योद्धा पुरस्कार covid yoddha purscar देऊन गौरविण्यात आले.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन नगराध्यक्षा साधनाताई भोसले,पंढरपूर नगरपरिषद मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर हे होते.


तालुका आरोग्य अधिकारी व आरोग्य सभापती यांनी कोरोना रोखण्यासाठी विविध योजना तयार केल्या.कोरोनाबरोबरच साथीचे आजार विषेशतः डेंग्यूची जनजागृती व उपाययोजना केली. नागरिकांच्या मनातील भिती कमी करण्याचा प्रयत्न केला. आरोग्य सेवेचे कर्तव्य बजावत असताना डॉ बोधले व आरोग्य सभापती परदेशी यांना कोरोनाची बाधा झाली.क्वारंटाइन कालावधी मध्ये दोघांनीही फोनवरून आपले कर्तव्य बजावले. कोरोनामुक्त झाल्यावर परत जोमाने कामास सुरुवात केली. या सेवेची दखल घेऊन त्यांना कोव्हीड योद्धा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

     आशा स्वयंसेविका अपेक्षा कुलकर्णी,(गट प्रवर्तक),तृप्ती परांडकर,राजश्री चव्हाण,आशा ठोकळे,आश्विनी सर्वगोड, सवीता डोके,शैला ढोबळे, निता सलगर,ज्योती हरीदास, वर्षा परबत, वंदना कटप,ज्योती बोधे,अमृता कटप,स्वाती कटप, भाग्यश्री सर्वगोड, दुर्गा मोहिते, रेशमा अभंगराव, प्रियांका सर्वगोड ,वैशाली कुचेकर, उल्फा लोंडसे, वैशाली धारेकर, स्वाती सुरवसे, मीनल ढावरे, साईश्री ढवळे,अश्विनी संगीतराव, आश्विनी वाडकर, रुपाली थिटे, सुवर्णा सुरवसे, उमा ईंगोले, रंजना ईंगोले, शितल घोडके, मनीषा बाबर,माधुरी सर्वगोड,कोमल बाबर,ज्योती अंकुशराव,सुवर्णा माने,मनिषा महामुनी,लतिफा बागवान, रामेश्वरी जाधव यांना नगराध्यक्षा साधनाताई भोसले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर,डॉ प्रदिप केचे,डॉ प्रसन्न भातलवंडे, लायन्स संस्थेचे सदस्य व मान्यवरांच्या हस्ते कोव्हीड योद्धा पुरस्कार देऊन गौरवण्यात आला.

आशाताई यांनी कोरोनाच्या कालावधीमध्ये सुरवातीपासून आजपर्यंत प्रशासनाच्या सुचने प्रमाने घरोघरी जाउन नागरिकांची तपासणी केली. नागरिकांना कोरोनाविषयी माहीती दिली.वाॅर्ड निहाय प्रतिबंधात्मक उपाय योजनाबद्दल माहिती सांंगून रुग्ण संदर्भित करण्याचे काम केले.या कामा बद्दल आशा कर्मचारी यांना कोव्हीड योद्धा म्हणुन गौरवण्यात आले.

पंढरपूरातील बांधकाम व्यावसायिक शार्दूल नलबिलवार यांनी कोविडच्या परिस्थितीमधे ज्या ठिकाणाहून मागणी होईल त्या ठिकाणी धान्य , औषधे व आर्थिक मदत पुरवली. स्वतःला व सर्व कुटुंबीयांना कोरोनातून बाहेर काढले याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.

शहरांमध्ये आरोग्य सभापती यांनी कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांच्या सोबत फिल्डवर राहून ही काम केले. ज्यावेळी बाहेर पडायला लोक घाबरायचे त्यावेळी त्यांनी फिल्डवर काम करून सर्वांना प्रोत्साहन दिले. पुर कालावधीत व नंतर स्वच्छता व निजंतुकिकरणावर भर दिला, नागरिकांना वेळोवेळी मार्गदर्शन केले.कोव्हीड वॉरियर,आशा कर्मचारी,नगरपालिकेतील कर्मचारी,सफाई कर्मचारी,प्रशासनाच्या मार्गदर्शनानुसार कंटेमेंट झोनमध्ये, आपल्या प्रभागामध्ये प्रतिकार शक्ती वाढवणारे अर्सेनीक अल्बम ३० होमिओपॅथिक औषध स्वखर्चाने दिले.कोरोनाच्या सुरवातीला नगरपालिका दवाखान्यात पिपीई किट तसेच निर्जंतुकीकरणाचे काम जलद व्हावे यासाठी नगरपरिषदेला इलेक्ट्रॉनिक हँड पंप स्वखर्चाने उपलब्ध करुन दिले. ज्या लोकांनी मदत मागितली त्यांना तळमळीने ती पुर्ण करण्याचा प्रयत्न आरोग्य सभापती विवेक परदेशी यांनी केला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ला.ललिता कोळवले यांनी केले.अध्यक्ष सुजाता गुंडेवार यांनी आभार व्यक्त केले.या कार्यक्रमास लायनेस अध्यक्षा डॉ.पल्लवी माने,सामाजिक कार्यकर्ते नवनाथ रानगट,डॉ प्रसन्न भातलवंडे,डॉ प्रदिप केचे, डॉ विवेक गुंडेवार,रा.पां.कटेकर,कैलास करंडे, इनरव्हील संस्थेच्या संस्थापिका नगीना बोहरी, वैशाली काशिद आदी उपस्थित होते.
 
Top