जेऊर ,(करमाळा),२५/१०/२०२०-"केंद्र शासनाने राष्ट्रीय पातळीवर शेतमाल वाहतुकीसाठी कार्यान्वीत वातानुकूलित रेल्वे सेवा याचा लाभ शेतकरी,त्यांच्या गट शेती अंतर्गत शेतकरी कंपन्या यांनी घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक लाभ घ्यावा हीच अपेक्षा आहे "असे उदगार कृषीरत्न व गटशेतीचे समर्थक आनंद कोठडीया यांनी काढले.


कंदर व शेटफळ येथील केळी,पेरू,मिरची यांना घेऊन किसान रेल्वे जेऊर रेल्वे स्थानकावरून रात्रौ नवी दिल्लीकडे रवाना झाली तेंव्हा प्रमुख पाहुणे म्हणून शेतमाल पूजन करतांना बोलत होते.यावेळी शेटफळचे सरपंच मधुकर पोळ,लोक विकास फार्म कंपनीचे अध्यक्ष गजेंद्र पोळ,विजूकाका लबडे,
मलवडीचे माजी सरपंच बळीराम जाधव,जेऊरचे माजी सरपंच राजुशेठ गादीया,कंदरचे केळी निर्यातदार किरण डोके ,मदर डेअरीचे प्रतिनिधी श्री.महांगडे आदी उपस्थित होते.


मालवाहतुकीत प्रतिकिलो रेल्वेने रु.तीन तर ट्रकने ७ रूपये खर्च येतो. आता प्रति किलो चार रुपये खर्च वाचतो आहे ,तेंव्हा शेतकऱ्यांना आता प्रती किलो २ रुपये दरवाढ व्हावी" अशी अपेक्षा कृषीरत्न आनंद कोठडीया यांनी व्यक्त केली.

आज दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर किसान रेल्वेच्या माध्यमातून जेऊर रेल्वे स्टेशनवरून करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचा शेतमाल केळी व पेरू हा दिल्ली बाजारपेठेत पाठवण्यात आला.

कंदर येथिल के.डी.एक्सपोर्टचे किरण डोके यांच्या प्रयत्नातून तालुक्यातील शेटफळ येथील मुरलीधर पोळ व इतर शेतकऱ्यांची केळी आणी शेटफळ येथील लोकविकास फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे विजय लबडे यांच्या व्ही.एन.आर जातीचा पेरू आजच्या पहिल्या रेल्वेडब्यातून पाठवण्यात आला.या रेल्वे डब्यातील शेतमालाचे पुजन आमचे सर्वांचे मार्गदर्शक कृषीरत्न आनंद कोठडिया यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांनी तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले .सुविधा सुरू करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले व यासाठी सतत पाठपुरावा करणारे किरण डोके यांचे कौतुक केले.

यावेळी जेऊर रेल्वे स्टेशन मँनेंजर सुनिलकुमार सिंग,इंजिनिअरींग विभागाचे रामजी गुप्ता, प्रदिप गव्हाणे,किरण डोके,प्रशांत नाईकनवरे,विठ्ठल रोंगे व कृषी विभागाचे केकान साहेब बेरे व शेतकरी उपस्थित होते.
 
Top