नवी दिल्ली,PIB Mumbai,११/१०/२०२०-परदेशात प्रवास करताना आंतरराष्ट्रीय वाहन चालक परवान्याच्या नूतनीकरण inter national driving licence renewal  सुविधेसाठी जनतेकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने, दि ०७ ऑक्टोबर २०२० रोजी जीएसआर 624 (ई) मसुदा अधिसूचना जारी केली असून ज्यांच्या आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग परमिटचा (आयडीपी) कालावधी ते परदेशात असताना संपला आहे, त्यांना आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग परमिट (आयडीपी) देण्यासाठी केंद्रीय मोटर वाहन नियम 1989 मध्ये दुरुस्ती करण्यासाठी मते आणि सूचना मागवल्या आहेत.

जे नागरिक परदेशात प्रवास करत आहेत किंवा अन्य देशात आहेत आणि आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग परमिट कालबाह्य झाले असून परदेशात नूतनी करणाची कोणतीही यंत्रणा नसल्याचे आढळून आले आहे . अशा नागरिकांच्या सोयीसाठी सीएमव्हीआर 1989 मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे. हे नागरिक, भारतीय दूतावास/मिशन ऍब्रॉड पोर्टलद्वारे अर्ज करू शकतात आणि हे अर्ज संबंधित आरटीओद्वारे विचारात घेण्यासाठी व्हीएएचएएन कडे जातात.

तसेच या प्रस्तावामध्ये आयडीपीसाठी अर्ज करताना वैद्यकीय प्रमाणपत्र आणि वैध व्हिसा या अटी रद्द करण्याचा देखील समावेश आहे कारण ज्या नागरिकांकडे वाहन चालविण्याचा वैध परवाना आहे त्यांना अन्य वैद्यकीय प्रमाणपत्रांची आवश्यकता असू नये. तसेच असेही काही देश आहेत ज्यात व्हिसा ऑन अरायवल आहे आणि अशा प्रकरणात प्रवासापूर्वी भारतात आयडीपी साठी अर्ज करताना व्हिसा उपलब्ध नसतो.

अधिसूचना जारी झाल्यापासून ३० दिवसांच्या आत सहसचिव (एमव्हीएल, आयटी आणि टोल), ईमेल: jspb-morth@gov.in, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, परिवहन भवन, संसद मार्ग, नवी दिल्ली -110001 यांना मते/ सूचना पाठवता येतील.
 
Top