हवाबंद पदार्थ सेवनाने आरोग्य धोक्यात 
बदलत्या जीवनशैलीबरोबरच भौतिक आहारातील खाण्या पिण्याची पद्धत बदलत असल्याने ती कुटुंब व्यवस्थेला हानीकारक ठरत असुन मानसिक स्वास्थ्याबरोबरच शारिरीक स्वास्थ्य बिघडवत आहे. बहुतेक कुटुंबात हवाबंद आहार सेवनाचे प्रमाण वाढत आहे,तसेच डोकेदुखीलाही वेदना शामक गोळ्यांचे सेवन वाढत असल्याने, तीच डोकेदुखी ठरत आहे.

कोणताही हवाबंद पदार्थ ३ दिवसांपेक्षा अधिक टिकवायचा असेल तर त्यात शिसे घालण्यावाचून वैज्ञानिक पर्याय नाही. त्यातच मर्यादेपेक्षा जास्त दिवस पदार्थ चांगला राहावा यासाठी मर्यादेपेक्षा जास्त शिसे संबंधित कंपन्या, संबंधित औषध कंपन्यांच्या संगनमताने व पुर्वनियोजनानुसार घालत असतात, त्यास सर्वस्वी जबाबदार अन्न व औषध प्रशासनाचा अर्थपुर्ण व्यवहार आहे.

सध्या सामान्य माणसांच्या आहारातील हवाबंद आहाराचे प्रमाण ४० ते ६० % झाले आहे. चाॅकलेट,बिस्कीटांपासून ते मुख्य आहारापर्यंत हवाबंद आहाराची मजल गेली आहे. त्यामुळे थेट रक्तातील शिश्याचे प्रमाण वाढत आहे. रक्तातील शिश्याचे प्रमाण वाढले की हिमोग्लोबीन, लोहाचे प्रमाण घटते. या वैज्ञानिक वशीकरणामुळे मानसिक व कौटुंबिक चिडचिडपणा,शारिरीक अशक्तपणा इत्यादी बाबी वृद्धींगत होतात.

  असे असुनही वैज्ञानिक निदान पद्धती औषधांचे खप वाढविणेसाठी चुकीची निदाने करुन रुग्णांच्या माथी मारतात,त्याची सुरुवात संकरित व रसायन युक्त आहारापासुन होते. अँलोपॅथीमध्ये पथ्यापथ्य नसतानाही अँलोपॅथीचे डाँक्टरांनी आयुर्वेदिक पथ्यापथ्य सांगण्याचे कारण काय? तर अँलोपॅथी मुळ आजार दाबते, त्याचे उत्खनन करत नाही. सध्या रक्तातील शिसे तपासणीची लॅब महाराष्ट्रात नाही,याचे दुर्दैव आहे.हवाबंद पदार्थ व औषधां विषयी वेळीच लक्ष न दिल्यास हवाबंद पदार्थ सेवन करणारे माणसांचे आरोग्य धोक्यात आहे, हे नक्की!

पुरोगामी संत महर्षी चरक यांचे शिष्य महर्षी वाग्भट यांनी नमुद केले आहे की, ”जिसे पवन का स्पर्श और सुर्य का प्रकाश ना मिले, वो अन्न मत खाए।” उदा. फ्रीज व कुकरमधील अन्न.

संदर्भ - वैज्ञानिक अंधश्रद्धा निर्मुलन काळाची गरज, संपादक - राधेश बादले पाटील, साप्ताहिक राष्ट्रसंत,पंढरपूर
 
Top