अचानक आलेल्या महापूरामुळे शेतीचे घराचे मोठे नुकसान

बेगमपूर,(प्रतिनिधी),दि.१८/१०/२०२०-कोरोना महामारीमुळे शेतकरी पुरता मेटाकुटीस आला आहे. त्यातच अतिवृष्टीचे आसमानी संकट शेतकऱ्यांवर आले आहे .भिमा नदीला अचानक आलेल्या महापूरामुळे शेतीचे घराचे मोठे नुकसान झाले.अचानक आलेल्या महापुरामुळे सावरण्यासाठी कोणताच वेळ मिळाला नसल्याने संसार उपयोगी साहित्य जागीच सोडून जीव वाचवण्या साठी सुरक्षित ठिकाणी जावे लागले त्यामुळे खाण्यापिण्याची आबाळ होऊ लागल्यामुळे जि.प.सदस्या शैला गोडसे यांनी मतदारसंघातील मिरी अरबळी बेगमपूर येथील पूरग्रस्त कुटुंबांना प्रत्यक्ष भेट देऊन आस्थेने विचारपूस करुन आम्ही आपल्यासोबत आहोत म्हणत त्यांना धीर दिला. त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे साहित्य दिले.

यावेळी मा.तंटामुक्त अध्यक्ष आप्पा पाटील,सरपंच हरीभाऊ काकडे ,मा.सरपंच रफीक पाटील, उपसंरपच बसवेश्वर पुजारी,चंद्रकांत सरवळे, भारत माने ,गजानन लाड,चंद्रकांत भोई,बबन राऊत,तलाठी गणेश साठे,ग्रामसेवक हरीष पवार, सुग्रीव पाटील,गजानन भोई ,संतोष भोई, गोपाळ भोई,चंदू भोई,बालाजी भोई ,मनोहर भोई,परमेश्वर भोई ,निखिल भोई, सिद्धेश्वर भोई ,नितिन भोई आदी उपस्थित होते.
 
Top