हार्वर्ड बिझनेस स्कूल अधिष्ठातापदी झालेली नियुक्ती

  मूळ भारतीय असलेले विश्वविख्यात शिक्षणतज्ज्ञ श्रीकांत दातार यांची जागतिक किर्तीच्या हार्वर्ड बिझनेस स्कूल अधिष्ठातापदी झालेली नियुक्ती महाराष्ट्र व देशाचा गौरव वाढवणारी आहे. मानवी मूल्यांची जपणूक करणाऱ्या त्यांच्या नेतृत्वानं हार्वर्ड बिझनेस स्कूलची प्रतिष्ठा अधिक वाढणार आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट केले आहे

तर जगातील हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या डीनपदी श्रीकांत दातार या मराठी माणसाची निवड झाली ही माझ्यासाठी आणि तमाम मराठी जनांसाठी अतिशय आनंदाची बाब आहे.१९०८ साली बोस्टन, मॅसॅच्युसेट्स येथे स्थापन झालेली ही संस्था जगातील पहिल्या पाच नामांकित संस्थांपैकी एक आहे. आज मराठी असंख्य तरुण-तरुणी जेव्हा परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी हार्वर्ड सारख्या ठिकाणी जाण्यासाठी धडपडत आहेत त्यावेळेस या सर्वोत्तम संस्थेचा प्रमुख मराठी माणूस असणं यासारखी अभिमानाची बाब दुसरी काय असणार अशी भावना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे. 

   श्रीकांत दातार १ जानेवारी रोजी हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या डीन पदाचा पदभार स्वीकारतील.एकशे बारा वर्षांच्या या प्रतिष्ठित संस्थेच्या डीनपदी निवड झालेले दातार हे दुसरे भारतीय आहेत. यापूर्वी ही जबाबदारी नितीन नोहरिया यांच्याकडे होती.
 
Top