माझी दृष्टी ... ......

पुनर्जन्म आहे का नाही माहीत नाही 
देव आहे का नाही वादविवाद आहे !
भूत आहे का नाही दाखवता येत नाही 
पण कर्मकांड आहे अंधश्रद्धा आहे 
वेगवेगळे प्रवाह आहेत हे खरं आहे 
पण कारणाशिवाय कांहीच घडत नाही 
हे मात्र अंतिम सत्य आहे म्हणून 
सत्य हीच शक्ति, सत्य हाची देव 
सत्य हेची विश्व ,सत्य हेची जीवन !!

  एक वास्तव :

ज्यांची बुद्धी मंद त्यांना अंधश्रद्धेचा छंद 
त्यांची प्रगती बंद आयुष्य होते अंध !!
नसते सत्व नसते सूत्र 
नसते सत्य नसते स्पष्ट 
सारेच फसवे सर्वत्र !!

भावनांचाच फक्त खेळ 
स्वप्नांचाच मेळ भोंदुगिरि सर्वत्र 
कोठेही जा पळसा पानं तीनच "!! 

आनंद कोठडीया,जेऊर
९४०४६९२२००


 
Top