पंढरपूर, १३/१०/२०२० - राष्ट्रवादी युवती प्रदेश काँग्रेसच्या संघटक चारूशिला कुलकर्णी यांनी पंढरपूरचे नुतन उपविभागीय पोलिस अधिकारी DYSP विक्रम कदम यांची सदिच्छा भेट घेवून शुभेच्छा दिल्या आणि पंढरपूर शहर व ग्रामीणमध्ये महिला व युवती सुरक्षितता, दक्षता कमिटी यासह महिला सुरक्षेबाबतच्या विषयांवर चर्चा केली.

यावेळी बोलताना,उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांनी महिला युवती यांचे सुरक्षितते साठी प्राधान्य देऊन गुन्हेगारांवर योग्य ती कारवाई करु असे आश्वासन दिले.

यावेळी पंढरपूर महिला तालुकाध्यक्षा अनिता ताई पवार यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यां उपस्थित होत्या.
 
Top