सरकोलीतील पूरग्रस्तांना स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांचा शंभर कुटुंबियांना मदतीचा हात
      पंढरपूर,१९/१०/२०२० - पाण्याने संपूर्ण वेढा घातलेल्या सरकोलीच्या मारुती मंदिरात श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट,पंढरपूरचे sveri संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी सरकोलीतील शंभर पुरग्रस्त कुटुंबियांना अन्नधान्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली.


सरकोली गावाला माण व भीमा या दोन्ही नद्यांमुळे बेटाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे तेथील नागरिकांचे अतोनात हाल होत होते. प्रशासनाची मदत देखील अजून पोहचली नाही. हे पाहून शिक्षणतज्ञ डॉ. रोंगे सर मदतीला धावले.

     बोटीतुन उतरल्यावर ग्रामस्थांनी डॉ.रोंगे सर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत केले.डॉ रोंगे सरांनी प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला.प्रास्ताविक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीनिवास भोसले यांनी केले.

   यावेळी डॉ.बी.पी.रोंगे Dr B.P.Ronge म्हणाले की,’सरकोली गावाला संपूर्ण पाण्याने वेढा घातला असून येथील नागरिक परिस्थितीला मागील काही दिवस धैर्याने टक्कर देत जीवन जगत आहेत. त्यांच्या धैर्याला सलाम. सध्याच्या परिस्थितीवर आपल्याला मात करायची आहे.त्यामुळे मदतीचा हात पुढे केला त्याचा आपण स्वीकार करावा.'

यावेळी प्राथमिक स्वरुपात पूरग्रस्त इंदुबाई बाबूराव बसरकोडे या महिलेला मदत करून सरकोलीमधील १०० कुटुंबीयांना मदत दिली. यावेळी राजेंद्र भोसले, अनिकेत गालफाडे, हनुमंत भोसले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्यकारणी सदस्य बाहुबली सावळे, विक्रम भोसले, संभाजीराजे शिंदे, दिलीप भोसले यांच्यासह सरकोलीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top