"वाखरीमध्ये कोरोना योद्ध्यांचा केला सन्मान!"

दि.१३ ऑक्टोबर २०२०-श्री गायकवाड ज्ञानेश्वर फाउंडेशन,वाखरी तसेच आहिल्यादेवी सार्वजनिक वाचनालय ,वाखरी यांचे संयुक्त विद्यमाने covid-19 योद्धा वाखरी व पंढरपूर परिसरातील मान्यवर अधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा सोशल डिस्टनसिंग चे पालन करून पार पडला.

     या कार्यक्रमासाठी नवनियुक्त उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम , तालुक्याचे गटविकास अधिकारी रविकिरण घोडके,पंढरपूर तालुका ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किरण अवचर, पंढरपूर तालुका ग्रामीणचे पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे,तालुका ग्रामीण वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले , गादेगाव आरोग्य केंद्राच्या प्रमुख श्री.तांबोळी मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सन्मान सोहळा पार पडला.

  वाखरी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने उपस्थित मान्यवरांना सन्मानित करून जे. बी. गायकवाड सर यांनी प्रास्ताविक केले.

 कोरोना काळात कोरोनाशी संघर्ष करताना जीवाची पर्वा न करता कठीण प्रसंगात समाजा तील लोकांसाठी वाखरीसह तालुक्यामध्ये अधिकारी, कर्मचारी यांनी गेली आठ महिने उत्तम प्रकारचे कार्य केलेले आहे.तसेच ते पुढेही चालू राहील आणि याच अनुषंगाने श्री.गायकवाड ज्ञानेश्वर फाउंडेशन वाखरी या संस्थेचे प्रमुख संग्राम गायकवाड तसेच आहिल्यादेवी होळकर सार्वजनिक वाचनालयाचे ज्योतीराम गायकवाड सर यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  

 यावेळी गटविकास अधिकारी रविकिरण घोडके , पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे , डॉ एकनाथ बोधले यांनी करोना योध्दयांचे कौतुक करून ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.आभार प्रदर्शन डॉ.धनाजी मस्के यांनी केले.

   या कार्यक्रमासाठी महिला कोविंड योद्धा यांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळेस श्री. गायकवाड फाऊंडेशनचे सर्व सदस्य,वाचनालयाचे सर्व सदस्य,
गावचे मा.सरपंच गंगाधर गायकवाड,पोपट गायकवाड,राजेश पवार सर,अंकुश गाजरे सर, समाधान गाजरे,वाखरीचे ग्रामपंचायत सदस्य श्री. राऊत सर,गादेगावचे ग्रामपंचायत सदस्य गणेश बागल, लक्ष्मण गायकवाड, राजू कोळी सर, केशव गायकवाड,सुधाकर गायकवाड,योगेश जाधव, योगेश शिंदे,महादेव गायकवाड,दिपक गायकवाड, श्रीयश अनुसे, प्रमोद गायकवाड,मयूर पोरे,विलास गायकवाड,इजि.सुजित गायकवाड,सहदेव पोरे, नितीन गायकवाड,राजू गायकवाड,दत्ता कोळी, विष्णू गायकवाड,महेश गायकवाड,नवनाथ मदने,  गणेश पोरे तसेच पत्रकार नवनाथ पोरे आदी उपस्थित होते.

श्री गायकवाड ज्ञानेश्वर फाउंडेशन, वाखरी यांनी यापूर्वी गावातील ७०० कुटुंबांना किराणा मालाचे वाटप केले होते.
 
Top