कोविड-19 च्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेच्या 'सीयूआरईडी' या क्लिनिकल ट्रायल संकेतस्थळाचा केला शुभारंभ
नवी दिल्ली,PIB Mumbai,२०/१०/२०२०- कोविड-19 च्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या 'सीयूआरईडी' या क्लिनिकल ट्रायल संकेस्थळाचा शुभारंभ केला. या वेबसाईटच्या माध्यमातून कोविडच्या वैद्यकीय चाचण्यांच्या सद्यस्थिती सोबतच औषध आणि निदान यासंदर्भातील माहिती उपलब्ध होऊ शकेल. संकेतस्थळ या https://www.iiim.res.in/cured/ किंवा http://db.iiim.res.in/ct/index.php. या लिंक वर उपलब्ध होऊ शकेल.

कोविड19 विरुद्धच्या लढ्यात सर्वात पुढे राहून केलेल्या प्रयत्नांबद्दल व क्लिनिकल चाचण्यांना प्राधान्य देणे,त्यांच्या नियामक मंजुरीसाठी डेटा तयार करणे आणि बाजारात औषधे व निदान सुरू करण्यात मदत केल्याबद्दल आरोग्य मंत्र्यांनी सीएसआयआरचे कौतुक केले.

या लढ्यात सुरक्षित अंतर,मास्क घालणे आणि इतर उपायांवर डॉ.हर्षवर्धन यांनी दिला भर

  एकीकडे वैज्ञानिक औषधे व लस विकसित करण्यावर काम करीत असताना आपण सर्वांनी सामाजिक अंतर, मास्क घालणे आणि इतर सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे आणि जर आपल्याला कोविड -19 विरूद्धचा लढा जिंकायचा असेल तर त्याचे पालन केलेच पाहिजे, यावर डॉ. हर्षवर्धन यांनी भर दिला.

सीएसआयआर, आयुष औषधाच्या क्लिनिकल चाचण्यांसाठी आयुष मंत्रालयाबरोबर काम करीत आहे आणि आयुष रोग प्रतिबंधक औषध आणि रोगनिदान विषयक उपचारपद्धती तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत.
 
Top