टोलनाका:

नेते येतात जातात , पाहणी करतात
प्रसार माध्यमात मात्र झळकतात
शेतकरी मात्र ,उपेक्षित जागेवरच कुजतात
हे राजकारण आहे
सतत खाजवत बसावे लागते म्हणूनच ते
गजकरण आहे "!!

कैफियत महापुरग्रस्त शेतकऱ्यांची ..........महापुरात समदं वाहून गेलं
वावराला टक्कल पडलं
सारी माती वाहून गेली
आता उरला फकस्त माळ!
कसं पेरायचं ? पंचनामा होईल
सरकारी मदत येईल
पर माती कोठून आणणार ?
बा म्हणत व्हता पोरा दोन डोई जात्यात
तवा योक एकरात योक इंच माती तयार व्हतीया
तवा दोन डोई शेतीत कंचच परवडणार नव्ह !
आता माझं काय सुदीक खरं नव्ह 
तुझ्या बरोबर मी देखील 
राबल एवढंच माझ्या हाती हाय 
सावकार जगूच देनार नाय 
आपुनच आपल्या श्रमावर पुन्हा लढत राहू "
बा च्या या शब्दांन मला सावरलं अन 
कामास लागलो
आता सरकारनं आम्हांस बळ द्यावं 
एवढीच यीनंती"!!

आनंद कोठडीया,कृषीरत्न,जेऊर
९४०४६९२२००


 
Top