आयुर्वेद व्यासपीठातर्फे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचे आभार
नाशिक,१६/१०/२०२० - केंद्रीय आयुष मंत्रालयाने कोविड 19 या आजारावर उपचार करण्यासाठी आयुर्वेद व योग या शास्त्रावर आधारित मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केलेल्या आहेत . या प्रोटोकॉलचे प्रकाशन केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.हर्षवर्धन यांच्या हस्ते झाले.केंद्र शासनाने कोविड 19 आजारावर आयुर्वेद व योग उपचाराची शिफारस केली आहे.

केंद्र शासनाच्या या धोरणाबद्दल इंडियन मेडिकल असोसिएशन या संघटनेने टीका केली आहे व तसे पत्र आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना त्यांनी पाठवले आहे .

या पार्श्वभूमीवर देशातील आयुर्वेद वैद्यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या आयुर्वेद व्यासपीठ या संघटनेने डॉ. हर्षवर्धन यांचे आभार मानले आहेत व तसे पत्र त्यांना व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले आहे .आयुष मंत्रालयाने केलेला हा प्रोटोकॉल विविध आयुर्वेद रुग्णालयात व संस्थांत झालेल्या संशोधनावर आधारीत आहे आहे असेही प्रतिपादन या पत्रात केले आहे . सर्व आयुर्वेद क्षेत्रा कडून या प्रोटोकॉलचे स्वागत होत आहे .या परिस्थितीत इंडियन मेडिकल असोसिएशनने अशी आयुर्वेद विरोधी भूमिका घेणे चुकीचे आहे असेही सर्व आयुर्वेदीयांचे मत आहे.या पत्रावर आयुर्वेद व्यासपीठाच्या अध्यक्ष वैद्य रजनी गोखले व अन्य पदाधिकारी यांच्या सह्या आहेत अशी माहिती वैद्य एकनाथ कुलकर्णी यांनी दिली.
 
Top