कोरोना विषाणूविरूद्धच्या लढाईत नागरिकांचे प्राण वाचविणे हे आपले परम कर्तव्य असल्याचे मोदी सरकारचे मत

“ राष्ट्राला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संकल्पाचा पुनरुच्चार केला”

"लस विकसित होईपर्यंत बेपर्वाईने वागू नका” या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाचे अनुसरण करण्याची विनंती मी प्रत्येकाला करतो."

    नवीदिल्ली, PIB Mumbai - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, भारतीयांची सुरक्षा आणि निरोगी जीवनाला मोदी सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केल्यानंतर आपल्या ट्विटमध्ये शाह म्हणाले की, “कोरोना विषाणूविरूद्धच्या लढाईत नागरिकांचे प्राण वाचविणे हे आपले परम कर्तव्य असल्याचे मोदी सरकारचे मत आहे.राष्ट्राला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संकल्पाचा पुनरुच्चार केला”.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, "लस विकसित होईपर्यंत बेपर्वाईने वागू नका” हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाचे मार्गदर्शक मंत्रा प्रमाणे पालन करण्याची विनंती मी प्रत्येकाला करतो. ते म्हणाले, “केवळ एक संयुक्त आणि दृढनिश्चयी भारत या महामारीवर मात करू शकेल”.
 
Top