खरीप विपणन हंगाम २०२०-२१ साठी किमान आधारभूत किंमतीने खरेदी
  नवी दिल्ली,PIB Mumbai,१२ ऑक्टोबर २०२० - खरीपाचा,वर्ष २०२०-२१ चा विपणन हंगाम सुरु झाला असून, केंद्र सरकारने, सध्याच्या हमीभाव योजनेनुसार शेतकऱ्यांकडून हमीभावाने पिकांची खरेदी सुरु केली आहे.

    यंदाच्या खरीप हंगामासाठी धान म्हणजेच भात पिकाची खरेदी सुव्यवस्थित सुरु असून,११ ऑक्टोबर २०२० पर्यंत,३.५७ लाख शेतकऱ्यां कडून ८०३२.६२ कोटी रुपये किंमतीच्या ४२.५५ लाख मेट्रिक टन धानाची खरेदी करण्यात आली आहे.

त्याशिवाय, राज्यांकडून आलेल्या प्रस्तावानुसार, याच खरीप हंगामासाठी ३०.७० लाख मेट्रिक टन डाळी आणि तेलबियांची खरेदी करण्यास मंजूरी देण्यात आली आहे.तामिळनाडू,कर्नाटक,महाराष्ट्र, तेलंगणा, गुजरात, हरियाणा, उत्तरप्रदेश, ओदिशा, राजस्थान आणि आंध्रप्रदेश या राज्यांना ही मंजूरी देण्यात आली आहे.

  ११ ऑक्टोबरपर्यंत, सरकारने नोडल संस्थांच्या माध्यमातून ४.३६ कोटी रुपयांच्या ६०६.५६ मेट्रिक टन मूग आणि उडीद डाळींची किमान हमी भावा नुसार खरेदी केली आहे. तामिळनाडू ,महाराष्ट्र व हरियाणा या राज्यातील ५३३ शेतकऱ्यांकडून ही खरेदी करण्यात आली आहे.
यावर शेतकरी संघटनेचे आणि शेतकर्यांचे म्हणणे आवश्यक आहे. कारण अनेकवेळा  सरकारी यंत्रणा सज्ज झाली असली तरी कमी पडते आणि शेतकर्‍यांना अडचणी मुळे खाजगी व्यापार्यांना आपला माल कमी दरात विकावा लागतो.  
  खोबरे आणि उडीदविषयी सांगायचे झाल्यास,या दोन्ही मालाच्या उत्पादक राज्यात,सध्या बाजार भाव हमीभावापेक्षा अधिक आहे.खरीप हंगामा तील मूग आणि इतर खरीप डाळी तसेच तेलबिया यांच्या खरेदीला सुरुवात करण्यासाठी संबंधित राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी तयारी सुरु केली आहे.
     
कापसाच्या खरेदीला एक ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे.आतापर्यंत,म्हणजेच ११ ऑक्टोबर पर्यंत,भारतीय कापूस महामंडळाने ५२५२ शेतकऱ्यांकडून ७५४५ कोटी रुपये किमतीच्या २४८६३ गासड्या कापसाची खरेदी हमीभावानुसार पूर्ण केली आहे.
 
Top