सोलापूर ,१०/१०/२०२० - भारतीय जैन संघटना सोलापूर bharatiy Jain sanghatna मराठवाडा विभागाच्यावतीने रविवार दिनांक ११/१०/२०२० रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत बिजनेस गुरु राकेश जैन इंदोर यांचे झुम मिटींगद्वारे व्याख्यान होणार असून याचा सर्व व्यापारी बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन भारतीय जैन संघटनेचे राज्य उपाध्यक्ष केतनभाई शहा यांनी केले आहे.       

        देशामध्ये कोरोना महामारीने थैमान घातलेले असताना देशातील व्यापार हा आर्थिक संकटात सापडला त्याच्यामधून त्यांनी कसे सावरावे , पुढचा बिजनेस कसा करावा ऑन लाइनच्या युगात बिजनेस करण्याची पद्धत काय अशा अनेक विषयावर बिझनेस गुरू राकेश जैन हे व्यापाऱ्यांसाठी बोलणार आहेत तरी सर्वांनी मिटींगला फायदा घ्यावा असे आवाहन विभागीय अध्यक्ष शाम पाटील यांनी केली आहे .

    या कार्यक्रमासाठी महिला राज्य कार्यकारिणी कांचनमाला संगवे, महिला राज्य कार्यकारणी संतोष बंब,विभागीय महिला अध्यक्ष सुवर्णा कटारे,जिल्हाध्यक्ष अभिनंदन विभुते, विभागीय सचिव वालचंद पाटील, प्रवीणकुमार बलदोटा सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष ,महिला जिल्हाध्यक्ष माया पाटील , उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष अतुल आजमेरा, लातूर जिल्हाध्यक्ष केयूर कामदार ,लातूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष राजकुमार बोपलकर ,उस्मानाबाद जिल्हा ग्रामीण अध्यक्ष जयकुमार जैन  तसेच हद्दवाढ विभागाचे देशभूषण व्हसाळे,शहर महिलाध्यक्ष कामिनी गांधी, हद्दवाढ विभागाच्या पंकजा पंडित प्रयत्न करत आहेत. 
 
Top