बारामती ऍग्रो लिमिटेडच्यावतीने पंढरपूर तालुक्यातील विविध पुरबाधित गावात जीवनाश्यक किटचे वाटप
पंढरपूर, १९/१०/२०२० - १४ ऑक्टोबरपासून झालेल्या अतिवृष्टीचा फार मोठा फटका पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला असून अशातच भीमा नदीस महापूर आल्यामुळे हजारो एकर उभी पिके असलेले क्षेत्र पाण्याखाली गेले.तर हजारो लोकांना स्थालंतरीत व्हावे लागले .या गंभीर परिस्थितीची दखल घेत बारामती ऍग्रो लिमिटेड व कर्जत जामखेड एकात्मिक विकास फाऊंडेशन च्यावतीने तालुक्यात विविध गावात जीवनावश्यक साहित्याच्या किटचे वाटप करण्यात आले.
आ. रोहित पवार यांची संकटकाळी धावून येण्याची परंपरा कायम- गणेश गोडसे

आ. रोहित पवार यांनी केवळ कर्जत जामखेड हा आपला विधासभा मतदार संघच नाही तर सोलापूर जिल्ह्यातील विविध गावाच्या नागिरकांच्या समस्येकडे सदैव गांभीर्याने पहिले आहे तर जेव्हा गरज भासेल तेव्हा मदतीसाठी धाव घेतली आहे.लॉकडाऊनच्या काळातही बारामती एग्रो च्या माध्यमातून त्यांनी या परिसरातील नागिरकासाठी मोठ्या प्रमाणात सॅनिटायझर मास्क सह सुरक्षा साधने पाठविली होती.आता या परिसरात महापुरामुळे हजारो लोक विस्थापित झाल्याचे समजताच त्यांनी तात्काळ मदत पाठविली
याबाबत अधिक माहिती देताना शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे संस्थापक गणेश गोडसे यांनी दिलेल्या माहिती नुसार गुरसाळे येथील विठ्ठल प्रशाला, कामगार कॉलनी, गुरसाळे गाव ,व्होळे येथील शेरकर वस्ती,अरकिले वस्ती , खेडभोसे येथील दलित वस्ती,सुतार समाज वस्ती गावठाण तर देवडे येथील भोईवस्ती व गावठाण येथे पुरबाधितांना घरपोहोच सदर साहित्याचे किट वाटप करण्यात आले.

यावेळी विविध गावचे सरपंच,ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .
 
Top