हृदयरोगाचं प्रमाण वाढलं आहे

आजकाल हृदयरोग होणे अथवा हृदयविकाराचा झटका येऊन अचानक मृत्यू होणे ही बाब एखाद्या विशिष्ट वयानंतर होऊ शकते असे राहिले नाही. हृदयविकारांचे स्वरुप वेगाने बदलत आहे, त्याची तीव्रताही वाढते आहे. बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव या कारणांसोबत सातत्याने वाढता ताणतणाव हे कारणही हृदयविकार बळावण्यासाठी महत्त्वाचे आहे. विशी-तिशीतल्या उमद्या तरुणांचाही हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाल्याचे दिसत आहे . भारतात दरवर्षी होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी तब्बल ३२% मृत्यू हृदयरोगामुळे होतात. त्यामुळे असे दिवस साजरे करून हृदयरोगाविषयी जनजागृती करणे, हृदयरोग होऊ नये अथवा झाल्यास काय उपाय योजना करावी याची प्रत्येकाला माहिती असणे महत्वाचे आहे .हृदयाची काळजी घ्यायची असेल तर नेमके काय करायला हवे कारण इतर कुणापेक्षाही व्यसन करणाऱ्यांना हृदयरोग होण्याची भीती सर्वाधिक हृदयरोगाचं प्रमाण भारता मध्ये वेगाने वाढत आहे. कर्करोग, संसर्गजन्य आजारांइतकंच हृदयरोगाचं प्रमाणही झपाट्याने वाढलं आहे.इतर कुणापेक्षाही व्यसन करणाऱ्यांना हृदयरोग होण्याची भीती सर्वाधिक असते. त्यासाठी तंबाकू, धुम्रपान आणि मद्यपान अशा व्यसनांपासून दूर राहणे कधीही चांगले. त्याचबरोबर गरजेपेक्षा जास्त खाणे, साखर-मीठ व चरबीयुक्त पदार्थांचे अतिसेवन करणे तसेच कोणत्याही गोष्टीचा ताण घेणे ह्यागोष्टी ताबडतोब बंद करायला हव्यात .

हृदयरोग होण्यासाठी निश्चित वय नाही, तो कोणत्याही वयात येऊ शकतो. यासाठी वयाची तीस वर्षे पूर्ण होताच हृदयाची तसेच रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि मधुमेहाचीही तपासणी दरवर्षी करायला हवी.

हृदयरोग टाळण्यासाठी दररोज किमान अर्धा तास व्यायाम करावा. त्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते आणि रक्ताभिसरण प्रक्रियाही सुरळीत चालते. पायी चालण्याचा , सायकल चालविण्याचा व्यायाम करावा.आहारात नियमित हिरव्या पालेभाज्यांचा समावेश असावा तसेच फलाहार घ्यावा. संगीत,बागकाम,वाचन, योगसाधनेद्वारे तणावापासून दूर राहावे.

हृदयावर प्रेम करा कारण हृदयविकारांचे स्वरुप वेगाने बदलत आहे.या आजारांतील गुंतागुंतही पूर्वीपेक्षा अधिक झाली आहे.त्यामुळे हृदय विकारांचं बदलतं स्वरूप लक्षात घ्यायला हवं.

जागतिक हृदय दिवसाच्या हृदयापासून शुभेच्छा!

 
Top