सभापती रामराजे निंबाळकर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केेले अभिनंदन...

मुंबई,दि.०८/०९/२०२०- महाराष्ट्र विधानपरिषदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. यात एप्रिल पासून रिक्त असलेल्या उपसभापतीपदाची निवड घेण्याची सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी घोषणा केली. शिवसेनकडून शिवसेना प्रवक्त्या आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांना उमेदवारी देण्यात आली. दि.०८ सप्टेंबर, २०२० रोजी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. आज आ.डॉ.गोऱ्हे यांची एकमताने निवड करण्यात आली. याबद्दल सभापती ना.रामराजे निंबाळकर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस गटनेते शरद रणपिसे यांनी भाषणातून शुभेच्छा दिल्या.

डॉ नीलमताईंचा महिलांना खूप मोठा आधार

     यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आ.डॉ. गोऱ्हे यांचे अभिनंदन करताना म्हणाले की, डॉ गोऱ्हे ह्या सामाजिक कार्यात अतिशय सक्रिय आहेत. स्त्रियांच्या मूलभूत हक्कासाठी संघर्ष करणे, महिलांवर ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या ठिकाणी डॉ.नीलमताई धावून जातात. महिलांना खूप मोठा आधार डॉ नीलमताईंचा आहे. उपसभापतीपदामुळे त्यांना महिलां प्रश्नाचे निराकरण करण्यासाठी अधिक ताकद मिळेल .

विधिमंडळातील सदस्यांना न्याय देणे म्हणजेच नागरिकांना न्याय देणे -उपमुख्यमंत्री अजित पवार 

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र विधानपरिषदवर आ.डॉ.गोऱ्हे ह्या दुसऱ्यादा महिला उपसभापती झाल्याबद्दल अभिनंदन केले. विधिमंडळातील सदस्यांना न्याय देणे म्हणजेच नागरिकांना न्याय देणे असल्याचे उपमुख्यमंत्री श्री पवार यांनी सांगितले.आ.डॉ.गोऱ्हे उच्च शिक्षित, सुसंस्कृत, संयमी आहेत. ताईंच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला तर खूप मोठी यादी तयार होईल असे श्री पवार यांनी सांगितले. 

   काँग्रेस गटनेते आ.शरद रणपिसे,आ.कपिल पाटील तसेच संपूर्ण सभागृहाने आ.डॉ.गोऱ्हे यांचे अभिनंदन केले.

        उपसभापती आ.डॉ.गोऱ्हे यांनी आभार व्यक्त करताना शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सभागृहात असताना वैधानिक पदावर काम करण्याची संधी मिळते आहे हा अतिशय आनंदाचा क्षण असल्याचे सांगितले. 

  यावेळी उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी या निवडणुकीसाठी काटेकोर लक्ष दिल्याबद्दल तसेच शरद पवार यांचे विशेष आभार मानले.ना.अनिल परब,ना.सुभाष देसाई, खा.संजय राऊत,दिवाकर रावते,रामदास कदम ,मिलींद नार्वेकर यां शिवसेना नेत्यांचा व आ.शशीकांत शिंदे,आ.भाई जगताप , आ.जयंत पाटील,आ.कपिल पाटील यांच्या सहकार्याबद्दल आभार मानले.

   उपसभापती या पदाचा उपयोग समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी नक्कीच करू असेही डॉ.गोर्हे यांनी सांगत नवीन सदस्यांना डावलले जाणार नाही याची खात्री दिली. मंजुळा शेटे वा अन्य प्रलंबित केसेसमध्ये जे आवश्यक आहे ते सर्व करणेत येईल.
 
पहिल्या टर्म वेळी आदित्य ठाकरे यांनी अभिनंदन करताना ताई,तुम्ही काचेचे छत तोडून इतिहास निर्माण केला असे म्हणाले ते सत्य आहे. हे यश महाराष्ट्रातील सर्व महिलांचे असून राज्यातील प्रबोधनाच्या चळवळीमधून जी शक्ती मिळाली त्यातून हे छत तुटले आहे. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा जोतिबा फुले,सावित्री बाई फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे. 

त्यांनी आजच्या नेमणुकीबाबत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून नतमस्तक होते असेही उपसभापती आ.डॉ.गोऱ्हे म्हणाल्या.

शेवटी दुरितांचे तिमीर जावो ,
वि्श्व स्वधर्म सुर्ये पाहो
 जे खळांची व्यंकटी सांडो,
तया सत्कर्मी रती वाढो, 
जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात 
या पसायदानाने डॉ नीलम गोऱ्हे यांनी आभाराचे भाषण संपवले.
 
Top