वादळवाटमधून .....

सूर्य अजूनही नित्यनियामाने उगवतो 
वेळेलाच मावळतो, दिशा तो बदलत नाही 
कोणासाठी तो थांबत नाही 
त्याच टेंन्डर अद्याप काढता येत नाही 
म्हणून प्रकाश अजूनही करमुक्त आहे !!

तो मुक्त हस्ते उधळण करतो प्रकाशाची 
रेशनींग कोणा करता येत नाही 
युगे युगे लोटली, तोच कर्ताकरवीता सृष्टीचा 
त्यावर सत्ता कोणाची चालत नाही !!.....,,..

जीवनावर एक भाष्य :

"आपल्या जीवनाच गणित 
कसं सोडवायच ,ज्याच त्याने ठरवाव 
हे खरे पण असं जगावं की 
इतरांच जगणं सोपं व्हावं 
सृष्टीला फूलवाव ,सुखाचे सोबती 
सतत मिळवत जावं 
जेवढी माणसं जोड़ता येतील तेवढी 
सतत जोडत रहावं 
आनंदाची मशागत करत 
मानवतेच पीक घ्यावं, सार्थक करावं 
माणसांची दौलत पाहून ,दगडातील देवांनीही लाजाव 
गेल्यावरही आपलं नांव निघाव
आपलं जीवन एक प्रेरणा होतं जावं !!

आनंद कोठडीया,९४०४६९२२००  
Top