आज कोरोना पाॅझिटिव्ह ४८ तर ३७ जणांना डिसचार्ज

कुर्डुवाडी (राहुल धोका) - माढा तालुक्यात आज कोरोना पाॅझिटिव्ह ४८ तर ३७ जणांना डिसचार्ज मिळाला. माढा तालुक्यात आज ४८ पाॅझिटिव्ह रुग्ण नव्याने आढळले असून कोणाचाहि मुत्यु‌ झाला नाही हि समाधानकारक बाब आहे.

कुर्डुवाडी येथे पंचायत समिती येथील शिबीरात ३९ जणांचे रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली असून १७ जण पाॅझिटिव्ह आढळले आहेत.

पंचायत समिती, कुर्डुवाडी येथे नगरपरिषद व ग्रामिण रुगणालय यांच्याकडून सकाळी ९ ते सांय ५ पर्यंत मोफत रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. दि २० तारखेपर्यंत सदर अभियान चालु राहणार आहे.

कुर्डुवाडी १५ ,भोसरे ३, रिधोरे १ ,वडाचीवाडी २, रोपळे ४, धाणोरे ३ , मोंडनिंब २, बेंबळ ७, घोटी १ ,टेंभुर्णी २ ,आलेगाव बु १, माढा ६ , तांदुळवाडी १ असे रुग्ण पाॅझिटिव्ह आढळल्याची माहिती तालुका विस्तार अधिकारी संतोष पोतदार यानी दिली.
 
Top