सुशीलकुमार शिंदे यांच्या दीर्घायुष्यासाठी श्री विठ्ठलास साकडे

 पंढरपूर,(प्रतिनिधी)- माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसचे जेष्ठ नेते द. बडवे व सुदर्शन खंदारे यांच्या वतीने आज पंढरपूर येथील दत्तघाट येथे भोजन वाटप करण्यात आले आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या दीर्घायुष्यासाठी श्री विठ्ठलास साकडे घालण्यात आले.


सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रेल्वे वाहतुक बंद असल्याने व गोरगरीब भाविक दर्शनरांगेच्या पत्रा शेडमध्ये मुक्कामी आहेत. त्यांना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन नागणे यांच्या हस्ते भोजन वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे द.बडवे यांच्या घरातील श्रीविठ्ठल मुर्तीसमोर सुशीलकुमार शिंदे यांच्या दीर्घायुष्या साठी प्रार्थना करण्यात आली.


   यावेळी नगरपालिका कामगार नेते महादेव वाघमारे, समाजसेवक दिलीप देवकुळे,पंढरी उदयचे संपादक सुदर्शन खंदारे, काँग्रेसचे जेष्ठ नेते द.बडवे, सुहास भाळवणकर, संतोष ताठे, नागनाथ अधटराव, शेखर मंगेडकर, देवानंद इरकल, सौ.संध्या बडवे, मिलींद अढवळकर, सुरेखा मोरे आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आभार संपादक सुदर्शन खंदारे यांनी व्यक्त केले.
 
Top