शिघ्र निदान व उपचार केंद्राची स्थापना

पंढरपूर,दि.२३/०९/२०२० - लायन्स क्लब पंढरपूर अंध विकास संस्था संचलित, शहीद मेजर कुणाल गोसावी निवासी अंध शाळा , पंढरपूर येथे शासनाच्या आदेशान्वये शिघ्र निदान व उपचार केंद्राची स्थापना संस्थेचे अध्यक्ष मुन्नागिर गोसावी यांचे मार्गदर्शनाखाली शासनाचे covid-19 चे सर्व नियम पाळून लायन्स क्लब पंढरपूरच्या अध्यक्षा डॉ सुजाता गुंडेवार यांच्या हस्ते करण्यात आले या केंद्रांमध्ये ० ते ०५ वर्षे वयोगटातील अंध बालकांची मोफत तपासणी करून मोफत उपचार केले जाणार आहेत व त्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य , मार्गदर्शन या केंद्रामार्फत दिले जाणार आहे. या कक्षाच्या माध्यमातून दिव्यांग बालकांचा लवकरात लवकर शोध घेऊन निदान व उपचार करण्याबाबतची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन शून्य ते पाच यामधील अंध बालकांचा शोध घेऊन नोंदणी करणे ,अंधांमध्ये दिव्यांग शिक्षणाची जनजागृती करणे व अंध बालकांवर शीघ्र निदान करून बालकास सामान्य मुलांप्रमाणे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.अंध बालकांच्या पालकांना मार्गदर्शन करून बालकांच्या विकासासाठी मोफत प्रशिक्षण या केंद्रात देण्यात येणार आहे .


या कार्यक्रमांमध्ये डॉ सुजाता गुंडेवार यांनी मनोगत व्यक्त केले .यावेळी संस्थेचे खजिनदार डॉ विवेक गुंडेवार, उपाध्यक्ष डॉ कमलकिशोर बजाज उपस्थित होते.


      उपचार या केंद्रामार्फत मोफतरित्या करण्यात येणार

या समितीमधील डॉ मनोज भायगुडे यांनी डोळे व त्याचे कार्य याविषयी माहिती सांगून डॉ गुंडेवार यांच्या मदतीने जन्माच्या अगोदरच बालकांची माहिती घेऊन योग्य तो उपचार करण्यात येतील असे सांगून जन्मानंतर डोळ्यांची तपासणी व पुढील उपचार या केंद्रामार्फत मोफतरित्या करण्यात येणार असल्याचे सांगितले .


    उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ संभाजी भोसले यांनी शासकीय व खासगी डॉक्‍टर मिळून हे केंद्र अत्यंत उत्कृष्टरित्या चालवतील असे सांगितले.अंगणवाडी सेविका सौ जयश्री बोरामणीकर यांनी मनोगत व्यक्त केले. 

   या कार्यक्रमाचे आभार आणि सूत्रसंचालन अंध शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका श्रीमती पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेश म्हेत्रे सर, नितीन कटप सर यांनी प्रयत्न केले. अनिल कुंभार व सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. या केंद्रांमध्ये सहभागी होण्यासाठी श्रीमती पाटील मॅडम ९९२२३९२७१५ व महेेेश म्हेत्रे सर ९४२३३३५९०३ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष मुन्नागिर गोसावी यांनी केले आहे. 
 
Top