संस्था मानसिक आधाराची, आर्थिक मदतीची गरज भागवत आहे

अकलूज, २८/०९/२०२०- कोरोनाच्या संकटकाळात श्री सन्मती सेवादल बहुद्देशीय अल्पसंख्यांक संस्था जैन समाज बांधवांना मानसिक आधार देतानाच आर्थिक मदतही करत आहे आतापर्यंत कोरोना रुग्णांना आठ लाखांची मदत दिल्याचे संस्थापक-अध्यक्ष मिहीर गांधी यांनी सांगितले. सर्वच जैनधर्मीय आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत. मोठ्या आजारांवर महागडे उपचार करण्याची त्यांची क्षमता नसते. अशा वेळी ही श्री सन्मती सेवादल बहुद्देशीय अल्पसंख्यांक संस्था मदत करत असून रुग्णांना मानसिक आधाराची,आर्थिक मदतीची गरज भागवत आहे . श्री सन्मती सेवादल बहुद्देशीय अल्पसंख्यांक संस्थाचे एक हजारापेक्षा अधिक सदस्य कार्यरत आहेत.


श्री सन्मती सेवादल बहुद्देशीय अल्पसंख्यांक संस्था सेवा दलाचे संस्थापक अध्यक्ष मिहीर गांधी म्हणाले दरवेळी शासकीय मदतीची अपेक्षा न ठेवता कार्यकर्तेही आपापल्या परीने आर्थिक योगदान देत आहेत.समाजाच्या प्रगती व प्रसारासाठी आम्ही सन्मती सेवा दल अल्पसंख्यांक संघटनेची स्थापना केली आहे. समाज बांधव मानसिक आणि आर्थिक अडचणीत असतात अशा वेळी प्रत्येक वेळी शासनाच्या मदतीची अपेक्षा करता येत नाही. त्याऐवजी आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन करून मदत गोळा करत आहे. राज्यातील मोठ्या शहरांतसह खेडोपाडी श्री सन्मती सेवादल बहुद्देशीय अल्पसंख्यांक संस्था सेवा दलाचे संस्थापक अध्यक्ष मिहीर गांधी म्हणाले दरवेळी शासकीय मदतीची अपेक्षा न ठेवता कार्यकर्तेही आपापल्या तीनुसार आर्थिक योगदान देत आहेत समाजाच्या प्रगती व प्रसारासाठी आम्ही सन्मती सेवा दल अल्पसंख्यांक संघटनेची स्थापना केली आहे समाज बांधव मानसिक आणि आर्थिक अडचणीत असतात अशा वेळी प्रत्येक वेळी शासनाच्या मदतीची अपेक्षा करता येत नाही. त्याऐवजी आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन करून मदत गोळा करत आहे .राज्यातील मोठ्या शहरांसह खेडोपाडी श्री सन्मती सेवादल बहुद्देशीय अल्पसंख्यांक संस्था सेवा दलाच्या कार्यकर्त्यांचे जाळे आहे. त्यामुळे हा संदेश समाजातील दानशूर पोचतो आणि आर्थिक मदत सहजरीत्या उपलब्ध होत आहे. यामध्ये कार्यकर्त्यांचेही मोठे योगदान आहे.
जैन समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत रुग्णांवरील उपचाराचा खर्च रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या आवाक्याबाहेर असल्यास ते संस्थे कडे संपर्क साधतात. सन्मती सेवा दलाकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचे आवाहन केले जाते, त्यानुसार समाजातील दानशूर व्यक्ती आणि सदस्य आर्थिक मदत करत असतात . काहीजणांनी रुग्णांसाठी आपली इमारत,इतर वस्तू जेवण, नाश्ता यांची सोय केली आहे.काही सदस्यांनी समाधानही केले आहे रुग्णांच्या परिसरातील श्री सन्मती सेवादलाचे सदस्य त्यांच्याशी संवाद साधून त्यांना कोणती मदत हवी नको याची चौकशी करून रुग्ण व नातेवाईक यांना मानसिक आधार देत आहेत. मदतीनंतर रुग्णही सन्मती सेवा दलाने दिलेल्या मदतीबद्दल आभार, कृतज्ञता व्यक्त करत आहेेत.

या मदतीसाठी संस्थेचे अध्यक्ष संदेश गांधी, मयूर गांधी, महावीर शहा, राजेश शहा,नवजीवन दोशी, मनिष शहा ,अविनाश दोशी, प्रीतम कोठारी यांसह सर्व सेवादलाचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत .
 
Top