कुर्डुवाडी (राहुल धोका) - कुर्डुवाडी येथे शासकिय कोविड सेंटर त्याचप्रमाणे साखर कारखान्याच्या माध्यमातून येथे कोविड केअर उभा राहत नसल्याचे वृत्त ज्ञानप्रवाहने दिले होते.ज्ञानप्रवाहच्या या बातमीची आमदार संजय शिंदे यांच्याकडून दखल घेण्यात आली. 

  आज आमदार संजय शिंदे यांनी‌ तत्काळ डाॅ विलास मेहता यांच्याशी संपर्क करून त्याबाबतची  माहिती त्यांना दिली व सदर काम युध्दपातळीवर चालू करत असल्याचे सांगितले. 


कुर्डुवाडी नगरपरिषदेला सर्व सोयींनीयुक्त रुग्ण वाहिका घेण्यासाठी आमदार फंडातून अनुदान दिले गेले आहे आणि विठ्ठल शुगर येथेही रुग्ण वाहिका घेतली आहे. 
विठ्ठल शुगर ,म्हैसगाव येथे १०० बेडचे कोविड रुग्णालय साखर कारखान्याच्या माध्यमातून उभा करणारण्यासाठी युध्द पातळीवर काम चालु आहे - आमदार संजयमामा शिंदे
  कुर्डुवाडी येथे अद्यावत ५० बेडच्या कोविड सेंटर बाबत जिल्हाधिकारी,सिव्हील सर्जन व डीएचओ यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली आहे .
डाॅ विलास मेहता यांची काल प्रतिक्रिया घेण्यात आली होती.आमदार संजयमामा शिंदे आज डाॅ विलास मेहता यांना संपर्क करुन सदर विषयी माहिती दिली आसल्याचे डाॅ विलास मेहता यांनी सांगितले.
  जीवनरक्षा समिती,जेष्ठ नागरीक संघटना,अँड हरिश्चंद्र कांबळे, कुर्डुवाडी व्यासपिठाने अद्यावत शासकिय कोविड हाँस्पिटलचा मुद्दा लावून धरला होता.आमदार संजयमामा शिंदे यांनी सकारात्मक निर्णय घेतला त्यामुळे त्यांचे या सर्व संघटनांनी आभार व्यक्त केले आहेत आणि यापुढेही असेच सहकार्य कायम राहील अशी अपेक्षा व्यक्त केली.

  शहरातील संकेत मंगल कार्यालय येथील कोविड केअरला तीन दिवसांपासून पाणी बंद होते व टँकरने पाणी पुरवठा करावा लागत होता. याची माहिती कोविड सेंटरमधून ज्ञानप्रवाह न्यूजचे प्रतिनिधी राहुल धोका यांना मिळाल्यानंतर त्यांनी 
पीडब्ल्यूडीच्या अधिकार्यांशी संपर्क केल्यानंतर पाणीपुरवठा पुर्ववत झाला असून अनेक कोविड रुग्णांनी त्याबदल पीडब्ल्यूडीचे अधिकारी आणि  ज्ञानप्रवाह न्यूजचे प्रतिनिधी राहुल धोका यांचे आभार मानले आहेत.
 
Top