ही संधी मिळाल्याने एक प्रकारे देशसेवाच करण्याचे भाग्य आम्हाला मिळाले


     पंढरपूर ,(प्रतिनिधी)- कोरोनाच्या काळात पोलीस प्रशासनास बंदोबस्तासाठी मदत करणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील आरएसपी शिक्षकांचा सोलापूर पोलीस अधीक्षक कार्यालया कडून प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

  पंढरपूर तालुक्यातील कलेश्वर पानसांडे,एस एच नडे,आर बी जाधव,एम एम जाधव,डी टी ओहळ या आर एस पी शिक्षकांनी पोलीस अधिकारी अतुल झेंडे, कुरी यांच्या आवाहनानुसार तसेच सोलापूर जिल्हा आरएसपी प्रमुख बोडरे,सहाय्यक अधिकारी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना संकटात बंदोबस्तासाठी विनामोबदला विशेष पोलीस अधिकारी म्हणून सेवा बजावली आहे. आपला जीव धोक्यात घालून या शिक्षकांनी केलेल्या बहुमोल सहकार्याबद्दल त्यांचा पंढरपूर पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

  यावेळी पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी आर एस पी शिक्षिकांनी केलेल्या कार्याचा गौरव केला. 

    कोरोनाच्या संकटातही पोलिसांना सहकार्य करण्याचे तसेच समाजासाठी दिशादर्शक कार्य करण्याची संधी मिळाल्याने एक प्रकारे देशसेवाच करण्याचे भाग्य आम्हाला यामुळे मिळाले आहे. अशी भावना या आरएसपी शिक्षकांनी यावेळी व्यक्त केली.
 
Top