कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे जी गंभीर परिस्थिती 

पंढरपूर ,१३/०९/२०२० - कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे जी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व व्यापारी यांची जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर,सोलापूर यांच्या निर्देशानुसार आज रविवार दि १३ सप्टेंबर २०२० रोजी नगरपरिषदेच्या सरकारी दवाखाना जुनीपेठ येथे सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० यावेळेत रॅपिड अँटिजिन टेस्ट घेण्यात आली.या रॅपिड अँटीजन टेस्टमध्ये सर्व व्यापारी ,त्यांच्या दुकानातील कर्मचारी, ड्रायव्हर, हमाल , तोलार, दिवाणजी व इतर संपर्कात असलेल्या १०३ व्यक्तींची रॅपिड अँटिजिन टेस्ट घेण्यात आली.


यामध्ये २७ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.यावेळी पंढरपूर नगरपरिषद मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव,आरोग्य समितीचे सभापती विवेक परदेशी,उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ बी.के.धोत्रे,हिवताप अधिकारी किरण मंजूळ, कार्यालय अधीक्षक प्रियांका पाटील, सर्व रुग्णालयातील कर्मचारी वर्ग हे या तपासणी वेळी हजर होते.

वास्तविक ही तपासणी नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घेऊन करणे गरजेचे आहे कारण अनेक नागरिकांनी काळजी घेतली असूनही बळी पडले आहेत.काही गैरसमजातून नागरिक रॅपिड अँटिजिन टेस्ट करून घेण्याबाबत टाळाटाळ करीत आहेत. तरी नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे नियमांचे पालन करावे
 
Top