पायल घोषने सिनेनिर्माता अनुराग कश्यपवर केलेल्या आरोपांची चौकशी करून कारवाई करा- केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले
     मुंबई ,दि.२१/०९/२०२० -अभिनेत्री पायल घोष यांनी सिनेनिर्माता अनुराग कश्यप यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांची सखोल चौकशी करून त्वरित त्यांना मुंबई पोलिसांनी अटक करायला पाहिजे होती मात्र अद्याप तशी कारवाई झालेली नाही. याप्रकरणी सीबीआय चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करून कंगना राणावत प्रमाणे अभिनेत्री पायल घोष यांना रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा असून पायल यांनी घाबरू नये असे आश्वासन आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी पायल घोष यांना दिले.

    आज अभिनेत्री पायल घोष यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली असून लवकरच त्यांची भेट घेणार असल्याचे ना. रामदास आठवले यांनी सांगितले.

         बॉलिवूडमध्ये स्ट्रगल करणाऱ्या कलाकारांचा निर्मात्यांनी,दिग्दर्शकांनी गैरफायदा घेण्याचे काही ठिकाणी प्रकार होत असतील तर ते रोखण्यासाठी अभिनेत्री पायल घोष यांनी केलेल्या आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजे. हिंदी सिनेसृष्टीत काही प्रमाणात होत असलेले गैरप्रकार या चौकशी मुळे थांबतील असे ना रामदास आठवले यांनी स्पष्ट केले आहे.
 
Top