पंढरपूर, (प्रतिनिधी)-जिल्ह्यातील हमाल मापाडी कामगारांचे प्रश्‍न प्रलंबित न ठेवता ते वेळच्या वेळी मार्गी लावले जातील. माथाडी बोर्ड हे स्वयत्ता बोर्ड आहे. हमाल तोलार श्रमजीवीच्या कष्टातून या बोर्डाची स्थापना झाली आहे. त्यामुळे हमाल तोलारांचे हे केंद्र बिंदू आहे.म्हणून हमाल तोलारांचे प्रश्‍न आपण मागी लावू. ज्या काय अडीअडचणी आहेत.त्या तात्काळ सोडविल्या जातील.कुठलीही अडचण त्यांना येऊ देणार नसल्याचे सहाय्यक कामगार आयुक्त तथा माथाडी बोर्डाचे चेअरमन निलेश यलगुंडे यांनी सांगितले. सोलापूर जिल्हा हमाल मापाडी पंचायत व माथाडी बोर्डाच्या वतीने सोलापूर येथील माथाडी बोर्डामध्ये जिल्ह्यातील हमाल मापाडी पंचायतच्या पदाधिकार्‍यांची बैठक आयोजित केली असता त्यावेळी ते बोलत होते.

    यावेळी जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे,उपाध्यक्ष पांडुरंग साबळे, सचिव आबाजी शिंदे आदीसह भीमा सिताफळे, दत्तात्रय मुरूमकर, गुरूशांताप्पा पुराणीक, सुरेश खैरार, हरिभाऊ कोळी, श्रीमंत डांगे, संतोष सावंत, सिद्धराम हिप्परगी आदीसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते. 

  यावेळी जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे म्हणाले की, जिल्ह्यातील हमाल मापाडी कामगारांचे अनेक प्रश्‍न रेंगाळत पडले आहेत.ते प्रश्‍न सोडविण्या साठी माथाडी बोर्डाने लक्ष घालावे.सर्व हमाली-मापाडी कामगारांचे पगार हे माथाही बोर्डातूनच झाले पाहिजे. हमाल मापाडी कामगार नोंदीत झाले पाहिजे. कामगारांचे मेडिकल बिल,बँक शिफारस तसेच मयतांचे क्लेम हे त्वरित झाले पाहिजे.

यावेळी जिल्ह्यातील हमाल मापाडी पंचायत सर्व पदाधिकारी, माथाडी बोर्डाचे कर्मचारी देविदास साळुंखे, संघान्ना मलाबदे आदीसह माथाडी बोर्डातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
 
Top