(अँड वर्षा गायकवाड यांचे रांगोळीच्या माध्यमातून कोरोना जनजागृती अभियान )

पुणे,(डॉ अंकिता सिध्दार्थ शहा),२०/०९ /२०२० - माझ्यामध्ये कोरोनाची (coronavirus)सौम्य लक्षणं आहेत, रुग्णालया पेक्षा घरीच माझ्यावर उपचार करून मी लवकर बरा होईन, माझ्याकडे घरी आयसोलेट (home isolation) होण्या साठी पुरेशी जागा किंवा स्वतंत्र खोली आहे, असा विचार करून कोरोना झाल्यानंतर रुग्णालयात दाखल होण्याऐवजी घरीच आयसोलेट होण्याचा निर्णय घेत असाल तर सावध राहा.कारण हा निर्णय जीवावर बेतू शकतो.


रुग्णांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर जेव्हा त्यांना रुग्णालयात भरती व्हायला सांगितले जाते तेव्हा रुग्ण आपल्या घरी आयसोलेशनसाठी अनेक खोल्या असल्याचं सांगतात. नुकतेच एकाच कुटुंबातील अनेक जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यावेळी त्या कुटुंबाने आपल्या घरी आयसोलेशनसाठी सर्वांसाठी वेगवेगळ्या खोल्या असल्याचं सांगत, रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला होता.

जे रुग्ण घरीच उपचार घेत आहे.डॉक्टरांशी फोन वरून संवाद साधून त्यांचा सल्ला घेत आहेत किंवा प्रत्यक्ष तपासणीस आलेले काही रुग्ण आपल्याला असलेले आजार आणि लक्षणं तसेच कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेले असूनही ते हे डॉक्टरांपासून लपवत आहेत.

असे एक दोन नाही तर कित्येक रुग्ण आहेत. जे डॉक्टरांपासून आपले आजार, लक्षणं आणि खरी परिस्थिती लपवत आहेत.घरीच आयसोलेट होतात आणि मग लक्षणं गंभीर होऊन त्रास होऊ लागला की रुग्णालयात धाव घेत आहेत.कोरोना संसर्गात फक्त ऑक्सिजनचा प्रश्न नाही तर रुग्णांना हृदय आणि मेंदूसंबंधी उद्भवू शकतात ज्या प्राणघातक ठरू शकतात. त्यामुळे लोकांनी घाबरून न जाता किंवा मला काय होणार आहे ? असे न करता कोरोनाबाबत गांभीर्याने घ्यायला हवे . कोरोना बाबतच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून आपला बचाव करणे सर्वात सोपा मार्ग आहे.
 
Top