पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी आमदार प्रशांत परिचारक यांची एकमताने निवड

पंढरपूर,२४/०९/२०२०- पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन सहकारातील डॉक्टर माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचे मागील महिन्यात निधन झाल्याने चेअरमनपद रिक्त झाले होते. त्यामुळे कारखान्याची दि २४/०९/२०२० रोजी पांडुरंग श्रीपुर कारखाना कार्यस्थळावर संचालकांची बैठक होऊन यामध्ये सर्वानुमते पांडुरंग परिवाराचे प्रमुख तसेच सोलापूर जिल्ह्याचे आमदार प्रशांत परिचारक यांची एकमताने निवड करण्यात आली.

पाच वर्षापासून कै. सुधाकर परिचारक यांनी या कारखान्याची चेअरमन म्हणून धुरा सांभाळली होती. या रिक्त झालेल्या जागेवर आज आमदार प्रशांत परिचारक यांची चेअरमनपदी निवड करण्यात आली .

   प्रशांत परिचारक यांनाही सहकाराचा प्रदीर्घ अनुभव असून ते ही जबाबदारी समर्थपणे धुरा सांभाळतील असा सर्व संचालक सहकारी आणि सभासद शेतकऱ्यांना विश्वास असल्याने सर्वांनी एकमताने चेअरमनपदाची धुरा परिचारक यांच्या वर सोपवली .व्हाईस चेअरमन म्हणून वसंत देशमुख यांची ही निवड करण्यात आली.

  निवडीनंतर आमदार प्रशांत परिचारक यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून ते माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांची उणीव भासू देणार नाहीत असा विश्वास व्यक्त करत आहेत . 
 
Top