पर्यावरणपूरक गणपती सजावटमध्ये चैताली कवडे प्रथम

पंढरपूर : लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाचे स्वरूप, त्याचा आयाम आता पूर्णपणे बदलतो आहे. काही अपवाद वगळता या सणाच्या उपयुक्ततेकडे दुर्लक्ष होत चालले आहे. यामुळे इनरव्हील क्लब पर्लने पर्यावरणपूरक गणपती सजावट ही स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये चैताली प्रदिप कवडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.


            लॉकडाऊनमुळे आँनलाईन कार्यशाळा

  इनरव्हील क्लब पर्लच्या माध्यमातून क्लब अध्यक्षा विद्या रेपाळ प्रत्येक वर्षी पर्यावरण पूरक गणपती शिकवण्याची कार्यशाळा घेत असतात. यावर्षी लॉकडाऊनमुळे त्यांनी आँनलाईन कार्यशाळा घेऊन आपले कार्य चालू ठेवले.गणपती शाडू मातीचा असावा, सजावट करताना पर्यावरण पूरक वस्तू वापरलेल्या असाव्यात, सजावट सुंदर तर असावीच सोबत बाप्पाचे दर्शनही नीट व्हावे, व्हिडिओ कॉलिटी उत्तम असावी, गणपती विसर्जन घरीच केलेले असावे,असे पर्यावरण पूरक निकष या स्पर्धेत ठेवण्यात आले होते. 

   त्यानुसार स्पर्थेत चैताली प्रदीप कवडे (प्रथम), गीतांजली राजू देवकर (द्वितीय), उज्वला केतन कांबळे (तृतीय) तर उत्तेजनार्थ पारितोषिक हे प्रथमेश प्रतापसिंह माने, तन्वी प्रतापसिंह माने, ऐश्वर्या रामचंद्र लाड यांना मिळाल्याचे डॉ.सायली लाड यांनी सांगितले.
 
Top