जीवनात प्रत्येकाने कल्पवृक्षाप्रमाणे परोपकारी जीवन जगून मनसोक्त आनंद घ्यावा

अलिबाग,(जेष्ठ पत्रकार जयपाल पाटील)१३/०९ /२०२०- निसर्गाच्या सानिध्यात मन कसे प्रसन्न होते याचा अनुभव मी घेत आहे .आज येथे माझ्यातून नारळाच्या रोपांची लागवड केली आहे .नारळाला आपण सारेजण कल्पवृक्ष म्हणतो, मानवी जीवनात आपली प्रत्येक वेळी शुभकार्यास त्याची गरज पडते आणि तो सर्वांना उपयोगी पडतो. त्याप्रमाणे आपल्या जीवनात प्रत्येकाने कल्पवृक्षाप्रमाणे परोपकारी जीवन जगून मनसोक्त आनंद घ्यावा असे मार्गदर्शन रायगडचा युवा फाऊंडेशन आणि परमानंद आश्रम दादर यांनी आयोजित केलेल्या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात पेण एज्युकेशनचे अध्यक्ष तथा रायगड जिल्हा शांतता कमिटीचे सदस्य अडवोकेट मंगेश नेने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तयावेळी त्यांनी केले. 

परमानंद आश्रम महाराष्ट्र शासनाने पर्यटन केंद्र म्हणून मान्यता दिली

 रायगडचा युवक फाउंडेशनचे अध्यक्ष रायगड भूषण जयपाल पाटील कार्यक्रमाचे अध्यक्षपदावरून बोलताना म्हणाले की, दादर खाडीकिनारी असलेला परमानंद आश्रम महाराष्ट्र शासनाने पर्यटन केंद्र म्हणून मान्यता दिली असून आश्रम विकसित होत आहे . येथे निसर्ग भरभरून असून शुद्ध हवेचे ठिकाण आहे. अडवोकेट मंगेश नेने यांच्या ४२ व्या वाढ दिवसाचे औचित्य साधून वृक्षारोपण करून येथे साजरा करीत आहोत आणि पर्यावरणाला मदत होत आहे याचा आश्रम वासियांना आनंद होत आहे.कोविड-19 संपल्यावर या ठिकाणी  सहकुटुंब भेटण्यासाठी यावे असे आवाहन त्यांनी केले आश्रमातर्फे एडवोकेट मंगेश नेने यांचा शाल व श्रीफळ देऊन सचिव उदय पाटील आणि खजिनदार जनार्दन पाटील यांनी सन्मान केला.

    यावेळी एड.नेने म्हणाले की, याठिकाणी पुढील काळात आमच्या कॉलेजच्या एनएसएस विद्यार्थ्यांचा कॅम्प आयोजित करण्यात येईल.यावेळी आश्रमाचे अध्यक्ष कृष्णकांत पाटील , सहसचिव नरेंद्र पाटील , खजिनदार एकनाथ पाटील, गोरखनाथ पाटील ,गुरव सर, संपादक वैभव कांबळे ,आपत्ती व सुरक्षा मित्र विकास रणपिसे, अब्दुल शेवगावकर, संजीव कांबळे आणि दादर ग्रामस्थ महिला मुले मुली सुरक्षित अंतर ठेवून कार्यक्रमात सहभागी झाले होते .
 
Top