पंढरपूर - पै.पांडुरंग तात्या माने यांच्या तृतीय पुण्यतिथी निमित्त अन्नधान्य वाटप करण्यात आले. अशी माहिती पांडुरंग तात्या माने फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निलेश माने यांनी पत्रकाद्वारे दिली.    

    पांडुरंग तात्या माने यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव निलेश माने यांनी पांडुरंग तात्या माने फाउंडेशन संस्थेच्यावतीने कोरोनाच्या काळात सलग शंभर दिवस सफाई कर्मचारी, गरजू, पोलीस प्रशासन व बेरोजगार यांना अन्नदान केले आहे.

    या कोरोनामुळे अनेकांना या लॉकडाउनच्या काळात उपासमारीची दिवस काढावे लागले आहेत.या गोष्टी लक्षात घेत कोरोनाच्या पार्श्वभूमी वर गरजूंना अन्नधान्याचे किट वाटप करून स्व.पै. पांडुरंग तात्या माने यांना श्रद्धांजली वाहिली.

  यावेळी सुरेखाताई माने व गणेश माने,फाऊंडेशन संस्थापक निलेश माने, पंढरी संचार संपादक श्री. बडवे,दिनेश माने,सावंत सर, बाबू संगमनेरकर, शकील मुलाणी,विशाल लवंड,उमेश जाधव,तन्मय अधटराव,रामलिंग पाटील, संकेत श्रीखंडे, मुकेश लकेरी आदींसह मित्र परिवार उपस्थित होते. 
 
Top