एक वर्षांपासून वंचित असलेल्या पूरग्रस्तांना तात्काळ शासकीय मदत द्या

पंढरपूर - एक वर्षापासून पूरग्रस्त अनुदानापासून वंचित असलेल्या पंढरपूर शहरातील नागरिकांना तात्काळ पूरग्रस्त अनुदान द्यावे अन्यथा २१ सप्टेंबरपासून पंढरपूर तहसीलसमोर आमरण उपोषणा करण्याबाबतचे निवेदन ॲड.किर्तीपाल सर्वगोड यांनी प्रशासनासाठी तहसीलदार यांना देण्यात आले आहे. यावेळी उमेश सर्वगोड,निलेश जाधव,प्रशांत सर्वगोड उपस्थित होते.

गेली एक वर्षापूर्वी चंद्रभागेला पुर आल्यामुळे पंढरपूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर,गोंधळी गल्ली, विठ्ठलनगर, भाई-भाई चौक, रोहिदास चौक, कुष्ठरोग वसाहत, विप्रदत्त घाट, बंकटस्वामी मठ परिसर, कालिकादेवी चौक, नागपूरकर मठ पाठीमागील भागात पुराचे पाणी शिरले होते. घरामध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.वरील परिसरातील बहुतांश लोक मजुरी करुन आपला उदरनिर्वाह करतात.प्रशासनाने या भागातील काही कुटुंबांना एक वर्षापासून शासकीय मदतीपासून वंचित ठेवले आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक पूरग्रस्त शासकीय मदतीसाठी वर्ष भरापासून तहसील कार्यालयात हेलपाटे मारत आहेत. मात्र प्रशासनाकडून नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ केली जात आहे.

शासकीय अनुदान पूरग्रस्त वंचित कुटुंबांना तात्काळ देण्यात यावे अन्यथा

शासकीय अनुदान पूरग्रस्त वंचित कुटुंबांना तात्काळ देण्यात यावे अन्यथा दिनांक २१ सप्टेंबर पासून वंचित कुटुंबांना नुकसान भरपाई मिळे पर्यन्त पंढरपूर येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा ॲड.कीर्तीपाल सर्वगोड यांनी निवेदनाद्वारे प्रशासनास दिला आहे
 
Top