नगरसेवक सौ राजश्री व अक्षय गंगेकर यांनी ५ लाखाचा निधी आणला

पंढरपूर,(प्रतिनिधी)-पंढरपूर शहरातील प्रभाग क्रमांक एक मधील नवीन कुंभार गल्ली व शिंदे नाईकनगरमध्ये गेल्या अनेक वर्षापासून रस्त्याचा प्रश्न प्रलंबित होता मात्र नगरसेवक अक्षय प्रताप गंगेकर व सौ राजश्रीताई प्रताप गंगेकर यांनी या भागा तील नागरिकांचा प्रलंबित रस्त्याचा प्रश्न सोडविला असून या ठिकाणचे सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटचे बनवण्यात येणार असून या कामासाठी पाच लाखाचा निधी मंजूर करून आणला आहे.
प्रभाग क्रमांक १ मधील शिंदेनाईकनगर व कुंभार गल्ली येथील रहिवाशांच्या मुलभूत गरजा सोडविण्यासाठी सतत पाठपुरावा सुरू ठेवल्याने अखेर अनेक वर्षांचा रस्त्याचा प्रलंबित असलेला प्रश्न सुटला असून कुंभार गल्ली व शिंदे नाईक नगर मधील अंतर्गत रस्ते आता सिमेंट काँक्रीटचे व मजबूत असे होणार आहेत.

अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला रस्त्याचा प्रश्न सुटणार

प्रभाग क्रमांक १ मधील रहिवाशांचा पिण्याच्या पाण्यासाठी अगोदरच ६० लाख रुपये मंजूर करून आणले. नगरसेवक अक्षय प्रताप गंगेकर व सौ राजश्रीताई प्रताप गंगेकर यांनी कुंभार गल्ली व शिंदे नाईकनगरमधील अंतर्गत रस्ते हे पाऊस पडल्यानंतर या भागातील नागरिकांना रहदारी करण्यासाठी प्रत्येक वेळी मुरूम टाकून लेवल करून देत होते. आता या भागातील रहिवाशांचा हा प्रश्न त्यांनी कायमचा सोडविला जाणार आहे. अंतर्गत रस्त्यासाठी नगरपरिषदेकडे सिमेंट काँक्रिटचे रस्ते बनवण्यासाठी प्रस्ताव दिला होता. सदर प्रस्ताव मंजूर करून घेऊन सतत पाठपुरावा करून प्रभागातील अंतर्गत रस्त्याच्या विकास कामासाठी पाच लाख रुपयाचा निधी मिळवून आणला आहे .
 
Top