बहुपर्यायी प्रश्नपत्रिका परीक्षेत आल्यास विद्यार्थ्यांचा गोंधळ उडण्याची शक्यता


मुंबई,दि.१६ सप्टेंबर २०२० - कोरोना साथ रोगाचे पार्श्वभूमीवर विद्यापीठ परीक्षांबाबत स्थगीत केलेल्या विद्यापीठ परीक्षा घेताना बहुपर्यायी प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहेत पारंपारिकरित्या विद्यार्थ्यांना वर्णनात्मक उत्तरे लिहिणे सवयीचे आहे.अशा परिस्थितीत नव्याने बहुपर्यायी प्रश्न पत्रिका परीक्षेत आल्यास विद्यार्थ्यांचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे.तसेच ऑनलाइन परीक्षा देणे शक्य नसलेल्या विद्यार्थ्यांना ऑफलाइनची परवानगी दिलेली आहे.तथापि यात ऑनलाइन पेपर आधी माहीत झाल्याने आँफलाईन परिक्षार्थींना प्रश्न आधीच माहिती पडण्याची शक्यता जाणवते .ऑनलाइन परीक्षा देताना काही तांत्रिक बिघाड झाल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याबाबतीत पुनर्विचार व्हावा अशी विनंती उपसभापती महाराष्ट्र विधानपरिषद ना.डॉ नीलम गोर्हे यांनी उच्च व तंत्रशिक्षण विभागमंत्री,उदय सामंत यांना केेली आहे .

तसेच राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये होत असलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये स्थानिक लोक प्रतिनिधी,आमदार,खासदार यांना सहभागी करण्यात येत नाही.तरी त्याबाबत कुलगुरूंना सुचित करावे .

विद्यापीठांच्या या मनमानीचा विद्यार्थ्यांवर प्रतिकूल परिणाम

विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठांनी अधिक जोमाने कार्यरत होऊन कोरोना साथ रोगाचे काळात विद्यार्थी नाउमेद होणार नाहीत ,याची काळजी आपण उत्तम प्रकारे घेत आहात ,परंतू राज्यात विविध विद्यापीठे स्वायत्ततेच्या आधारे कोणताही संवाद, विचारविनीमय न करता विविध घोषणा व परीक्षाविषयक नियम व निकष घोषित करताहेत. त्यात काही प्रमाणात सुसूत्रीकरण व मुंबई विद्यापीठाच्या धर्तीवर विचार करुन आराखडे देण्यास सर्व विद्यापीठांना सुचवावे.विद्यापीठांच्या या मनमानीचा विद्यार्थ्यांवर प्रतिकूल परिणाम होत असून विद्यार्थी व पालकांचे मनोबल खच्ची होत आहे.म्हणून परीक्षांचे सुसूत्रीकरण आपल्या विभागाने करावे असे मी आपणास निर्देशीत करत आहे असे उपसभापती महाराष्ट्र विधानपरिषद ना.डॉ नीलम गोर्हे यांनी सांगितले आहे.
 
Top