जागतिक महामारीचा विचार करून वृद्धाश्रम चालवण्याकरता आणि त्यांच्या देखभाली करता, संबंधित संस्थांना आगाऊ अनुदान देण्याचा केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाचा निर्णय

नवी दिल्‍ली,PIB Mumbai,१६ सप्‍टेंबर २०२०-
सध्याच्या काळात सुरू असलेली जागतिक महामारी आणि वृद्धाश्रम चालवणाऱ्या संस्थांकडे हे आश्रम चालवण्यासाठी आणि त्यांच्या देखभालीसाठी पुरेसा निधी उपलब्ध नसल्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने या संस्थांना आगाऊ अनुदान वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. या संस्थांना २०२०-२१ या वर्षात यापूर्वीच रु.८३.७४ कोटी रुपयांचा निधी आतापर्यंत देण्यात आला आहे.

२०२०-२१ मध्ये या संस्थांना यापूर्वीच ८३.७४ कोटी रुपयांचे आतापर्यंत वितरण

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय ज्येष्ठ नागरिकांसाठी एक राष्ट्रीय कृती योजनेची अंमल बजावणी करत असून त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या एकात्मिक कार्यक्रमाचा समावेश आहे.या कार्यक्रमाअंतर्गत वृद्धाश्रम चालवणाऱ्या राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेश प्रशासन (नोंदणीकृत सोसायट्यांच्या माध्यमातून)/पंचायती राज संस्था/ स्थानिक संस्था, बिगर सरकारी संघटना (एनजी ओ)/ स्वयंसेवी संघटना यांसारख्या संस्थांना अनुदान देण्यात येते.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रतन लाल कटारिया यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात आज राज्यसभेत ही माहिती दिली.
 
Top