सोशल मीडियावर व्हायरल होत असणारे मेसेजेस चुकीचे

  शेळवे,(संभाजी वाघुले)-सोलापूर शहर आणि जिल्ह्यात लॉकडाऊन केला जाणार असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल होत असणारे मेसेजेस चुकीचे आहेत. लॉकडाऊन केला जाणार नसून नागरिकांनी अशा कोणत्याही मेसेजेवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज केले आहे.

सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील काही भागात पुन्हा लॉकडाऊन लागू केला जाणार, अशा आशयाचे मेसेज सोशल मिडियावर व्हायरल झाले. याबाबत श्री.शंभरकर यांनी सांगितले की, हे मेसेजेस पूर्णपणे चुकीचे असून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण गोंधळून जाऊ नये

दिशाभूल करणारे मेसेज सोशल मीडियावरून फॉरवर्ड करणाऱ्यांवर पोलीस कारवाई

लॉकडाऊन जाहीर करण्याचे चुकीचे मेसेज सोशल मीडियाच्या माध्यमातून फॉरवर्ड करू नयेत. अशा प्रकारचे चुकीचे आणि जनतेची दिशाभूल करणारे मेसेज सोशल मीडियावरून फॉरवर्ड करणाऱ्यांवर पोलीस कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

येत्या रविवारी ‘नीट’ परीक्षा आहे. ती परीक्षा पूर्व नियोजित वेळेनुसारच पार पडेल, याची विद्यार्थी आणि पालकांनी नोंद घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रत्येक नागरिकांनी मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे,कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्वरीत दवाखान्यात जावे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये,असे आवाहन त्यांनी केले आहे.
 
Top