महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांचा दि.२१ सप्टेंबर, २०२० ते दि.२६ सप्टेंबर, २०२० या काळात विविध सामाजिक उपक्रमाच्या विषयात मार्गदर्शन व सहभाग...

पुणे,दि.२१/०९/२०२०-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती ना.डॉ.गोऱ्हे यांची ०८ सप्टेंबर २०२० रोजी एकमताने उपसभापतीपदी निवड झाली. मागील एक वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी सामाजिक तळागाळातील विषयावर बैठक घेऊन नागरिकांना न्याय मिळवून दिला. लॉकडाऊनमध्ये शहरी भागातून ग्रामीण भागात गेलेल्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनरेगामधून रोजगार ना.डॉ.गोऱ्हे यांनी मिळवून देण्याचा प्रयत्न केला.

पंढरपूर देवस्थानच्या डागडुजी करताना पुरातत्व विभागाच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करून बांधकामातील अडचणी दूर केल्या त्या बद्दल मंदिर समितीच्यावतीने ना.डॉ.गोऱ्हे यांचे आभार देखील मानण्यात आले होते. अशा अनेक विषयांना न्याय देण्याची भूमिका सातत्याने जनतेसाठी राहिली आहे. यामुळेच नागरिकांचे अनेक निवेदन, पत्र, फोन सातत्याने सुरू असतात याचा पाठपुरावा त्या स्वतः करतात. उपसभापती पदी नियुक्ती झाल्यानंतर ना.डॉ.गोऱ्हे यांचे या सप्ताहातील कार्यक्रम उपसभापती कार्यालय यांनी जाहीर केले आहेत. यात

दि.२१ सप्टेंबर,२०२० रोजी ,सायं. ०६ वाजता

● विषय- डॉ नीलम गोऱ्हे यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने महिला कवयित्रीचे संमेलन--
● संयोजक- अंजली कुलकर्णी लेखिका
● 'आनंदिनी' यु-ट्यूब वाहिनीवर प्रसारित होणार आहे.
संपर्क:- श्रीमती अंजली कुलकर्णी-9922072158

दि.२३ सप्टेंबर,२०२० , दुपारी - ०३ वाजता

● मकाम सेतू, जगण्याच्या हक्काचे आंदोलन आणि जन आरोग्य अभियान आयोजित -
अर्धा कोयता: परवड ऊस तोड कामगार महिलांची
मकाम महाराष्ट्र ने केलेल्या अभ्यासाची मांडणी आणि त्या आधारे चर्चा

ऊस तोड मजूर महिलांच्या प्रश्नांना समजून घेण्यासाठी

या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.बाबा आढाव असून कार्यक्रमात उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे, सामाजिक न्याय मंत्री ना.धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे ह्या दुरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होऊन विचार मांडणार आहेत.
संपर्क - श्रीमती सीमा कुलकर्णी-9423582423

दि.२४ सप्टेंबर, २०२० , दुपारी ०४ वाजता

राजगुरूनगर बँक नवनिर्वाचित अध्यक्ष विजया शिंदे तसेच संचालक व अधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी दुरदृश्य प्रणालीद्वारे संवाद
संपर्क : श्रीमती विजया शिंदे-9975499090

दि.२५ व २६ सप्टेंबर, वेळ - दु २ ते सायं ५

● विषय - डिजिटल महिला साहित्य संमेलन
● संयोजक - स्त्री आधार केंद्र, मुंबई मराठी पत्रकार संघ आणि महिला आर्थिक विकास महामंडळ आयोजित कार्यक्रमास दुरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थिती...
संपर्क :- श्रीमती उत्तरा मोने-9869149596

अशा विविध कार्यक्रमात ना.डॉ.निलमताई गोऱ्हे ह्या सहभागी होणार आहेत तसेच विचार ही मांडणार आहेत. या कार्यक्रमात ज्यांना सहभागी होण्याची इच्छा असेल त्यांनी कार्यालयाशी आपली नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी neelamgorheoffice@gmail.com या ई-मेल आयडीवर आपले नाव व मोबाइल नंबर पाठविल्यांनंतर तात्काळ कार्यक्रमाची लिंक पाठविण्यात येईल असे उपसभापती कार्यलयाचे जनसंपर्क अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी कळविले आहे.
 
Top